कराड: सरकार स्थापनेचा दावा कोणीच केला नाहीतर घटनात्मकपेच प्रसंग निर्माण होऊन राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस करावी लागेल अशी माहिती माजी मुख्यमंत्री. आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजप सेना युतीला लोकांनी सहमती दर्शविली असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारीने जनतेचे उत्तरदायीत्व स्वीकारून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. असे सांगुन आ. चव्हाण म्हणाले सत्ताधारी पक्ष कोणता निर्णय घेणार पुढे काय परस्थिती निर्माण होणार? यावर कॉग्रेस पुढील भुमिका ठरवणार आहे. राज्याला स्थीर सरकार दिले पाहिजे. जनते समोर आता प्रचंड मोठे संकट निर्माण झाले आहे. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. म्हणून आम्ही राज्यपालांची भेट घेतली व त्यांनीच काय तो निर्णय घ्यावा असे सुचविले. अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यांना धीर देण तसेच मदत करणे सरकारचे काम आहे. मात्र याचा विचार कोणी करायला तयार नाही. काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही. असे सांगत आम्ही आमची मते काँग्रेस श्रेष्ठीपुढे मांडली आहेत. असे उत्तर देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू या काँग्रेसच्या अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मताबाबत मात्र आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलण्यास टाळले व आम्ही या बाबत सोनिया गांधीशी बोलल्याचे सांगितले.
…तर राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागेल : आ. चव्हाण
RELATED ARTICLES

