सातारा: बोगस डॉक्टरांविरुध्द तक्रार येण्याची वाट न पहाता संबंधित तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकार्यांनी आपल्या परिसरातील अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या बोगस डॉक्टरांची माहिती घेऊन त्यांच्यावर पोलीसांकडे तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहामध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकीत्सक आमोद गडीकर, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये, जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
बोगस डॉक्टरांमुळे जनतेच्या आरोग्यास धोका असून रुग्णांची फसवणूक होत असते. सजग नागरिकांनी तसेच सामाजिक संस्थांनी आपापल्या परिसरातील बोगस डॉक्टरांची माहिती जिल्हा तसेच तालुका आरोग्य अधिकार्यांना माहिती द्यावी असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले. आरोग्य अनोंदणीकृत वैद्यक व्यावसायिकांव्यतिरिक्त वैद्यकीय व्यवसाय करणार्या विरोधात महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमाच्या कलम 33 (2) अन्वये 1 ते 3 वर्षे इतका सश्रम कारावास तसेच 1 ते 5 हजार आर्थिक दंड विहीत करण्यात आला आहे. यांनतरही संबंधितांकडून वैद्यकीय व्यवयाय चालू राहील्यास त्यापूढील प्रत्येक दिवसाठी प्रतिदिन रु.200 इतका दंड आहे.
बोगस डॉक्टर्स आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करा: रामचंद्र शिंदे
RELATED ARTICLES

