फलटण: फलटण येथील जी सद्गुरू प्रतिष्ठान संचलित ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने संत गाडगे बाबा महाराज पुण्यतिथी निमित्त फलटण शहरात घंटागाडी द्वारे स्वच्छतेत सहभागी असणार्या कर्मचार्यांचा सन्मान करून अनोख्या पद्धतीने संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
फलटण नगर परिषदेच्या बांधकाम सभापती अॅड. मधुबाला भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा प्रसंगी लायन्स क्लब, फलटण शाखेचे अध्यक्ष अर्जुन घाडगे, लायन सुहास निकम, लायन योगेश प्रभूने, अकॅडमीचे प्राचार्य प्रफुल्ल अडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फलटण नगरपरिषदेच्या घंटागाडीचे स्वच्छता सेवक मंगेश अहिवळे, नगरपालिकेच्या महिला कर्मचारी भारती सावंत, कमिन्स चे पर्यवेक्षक लक्ष्मीकांत जबुभी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रशालेचे शिक्षक दत्तात्रय पतंगे यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फलटण शहर स्वच्छ करण्यास योगदान देणार्या या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील कुमार पवार,सचिन देशपांडे, आशा कदम, तात्या आढाव या सेवक कर्मचार्यांचाही सत्कार करण्यात आला. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या भजनाने कार्यक्रमाचा शेवट झाला.
फलटणमध्ये अनोख्या पद्धतीने संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी
RELATED ARTICLES

