कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरु झालेला लॉक डाऊन कंटाळावाणा व नव्या चिंता निर्माण करणारा असला तरी नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणाराही ठरू लागला आहे.कमी होणारे प्रदूषण, पुरेशी विश्रांती, सुधारलेली जीवनशैली, कमी झालेला ताणतणाव यामुळे नागरिकांचे किरकोळ असणारे आजार व यातील सातत्य असणारे प्रमाण कमी झाले आहे.पिंपोडे परिसरातील ओपीडीची संख्याही कमालीची कमी झाली आहे.येथे ग्रामीण रूग्णालयासह अनेक खाजगी दवाखाने आहेत.वातावरणातील बदलामुळे सर्दी,खोकला आणि अंगदुखी याचे किरकोळ पेशंट सोडले इतर आजारांचे प्रमाणात घट झाली आहे .
दीर्घकालीन असणारे आजार व पाण्यापासून बाधित होणारे आजार यांची संख्या अधिक आहे,मात्र यामध्ये लॉक डाऊनमुळे यामध्येही संख्या रोडावली आहे.हे सगळे कोरानामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनशैली बदलेल्याचा परिणाम आहे.बहुतांशी लॉक डाऊनमुळे खाजगी दवाखाने बंद आहेत तर काही डॉक्टर माणुसकी दाखवत,प्रशासनाच्या सूचनेची अंमलबजावणी करत आरोग्य अत्यावश्यक सेवा देत आहेत.या अल्प प्रमाणामुळे दवाखान्यात नागरिकांना जाणे जमत नाही.तर दुसरीकडे वाहने बंद झाल्याने प्रदूषण कमी झाले,वेळ भरपूर असल्यामुळे आरामाचे प्रमाण वाढले त्यामुळे आजार सध्या दुरापास्त झाला आहे.ग्रामीण भागात शेतातील कामांना प्राधान्य दिले जात असल्याने शरीराच्या तक्रारारी कमी झाल्या आहेत.
जीवनशैलीमध्ये कमालीचे प्रमाण घटले
लोकांचा ताणतणाव व धगधगत कमी झाली आहे.सर्वात महत्वाचे प्रदूषण कमी झाले.बाहेरच्या खाण्याचे सेवन प्रमाण कमी झाले,पुरेशी विश्रांती मिळू लागली.व्यसनाधीनचे प्रमाण घटले,लॉक डाऊनच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन जीवनशैलीमध्ये सातत्य ठेवल्यास आरोग्य उत्तम व निरोगी राहू शकते.हेमलता कदम,पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रूग्णालय अधिकारी
आजार पळवणारी ही आहेत सक्षम कारणे== प्रदूषण घटले, बाहेरील अन्न खाण्याचे प्रमाण कमी,मास्कमुळे संसर्गचे प्रमाण घटले,पुरेशा विश्रांतीमुळे रोग प्रतिकार शक्तीत वाढ,वेळेत झोप,वेळेत जेवण,कुटुंबातील लोकांशी संवाद,छंद जोपासल्याने मानसिक स्वास्थ्य,योगासन व व्यायाम करण्यासाठी भरपूर वेळ आदी कारणे तज्ञ व्यक्तींच्या बोलण्यातून जाणवले.