औंध (वार्ताहर):- कोरोणा विषाणू प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी जमावबंदी ,संचारबंदीचा आदेश जारी केला असतानाही वडी ता.खटाव येथील सात जण हे किसननगर मुंबई येथून वडी येथे दाखल झाल्याने औंध पोलीस स्टेशनमध्ये सातही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
त्यामुळे औंध ,पुसेसावळी परिसरातील अनेक
गावांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,वडी येथील ग्रामस्तरिय समिती सरपंच अनिल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वडी ता.खटाव येथील एसटी स्टँड परिसरात नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना देत असताना सध्या किसननगर मुंबई येथे वास्तव्यास असलेले वडी येथील रहिवासी अशोक आण्णा येवले,जयसिंग अशोक येवले,अश्विनी जयसिंग येवले,पूर्वा जयसिंग येवले,आन्वीता जयसिंग येवले,अनिल कूष्णा मोहिते, हेमंत लक्ष्मण सावंत हे मुंबई येथून आल्याचे कमिटी सदस्यांना समजले.
यासर्वांनी जमावबंदी तसेच जिल्हा बंदी आदेश जारी केला असताना ही वरील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वडी ग्रामस्तरिय कमिटी अध्यक्ष व सरपंच अनिल सुर्यवंशी यांनी त्यांचे विरोधात औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सपोनि उत्तम भापकर अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान अनेक गावातील कमिटया या प्रकरणामुळे खडबडून जाग्या झाल्या आहेत व विनापरवाना गावात कोण आले आहे का याची माहिती घेऊ लागले आहेत.