पाटण:- कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर पाटण नगरपंचायतीने शहरात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबवली असताना मात्र इंधिरानगर व कातकरी वस्तीत सार्वजनिक स्वच्छतागृहाचे तीन – तेरा वाजले आहेत. स्वच्छालयावरील पत्रा वाऱ्याने उडून गेला आहे. काही ठिकाणी भिंतीला भेगा पडून ढासळण्याच्या मार्गावर आहेत. दरवाजे खिळखिळी झाली आहेत तर स्वच्छालयासमोर घाणीचे समराज्य साचल्याने वापराविना खितपत पडली आहेत. स्वच्छालयाच्या बिकट अवस्थेमुळे इंधिरानगर व कातकरी वस्तीतील अनेक अबालव्रुद नागरिक स्वच्छास उघड्यावर बसत असून येथील रहिवासी नागरिकांच्या अरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील बिकट अवस्थेची पाटण नगरपंचायतीने तातडीने दखल घेऊन रहिवासी नागरिकांना कायमस्वरूपी स्वच्छालय वापरासाठी दुरुस्त करून द्यावीत अशी मागणी रहिवासी नागरिकांनी केली आहे.
पाटण नगरपंचायतीच्या हद्दीत तहसील कार्यालया जवळ इंधिरानगर व कातकरी वस्ती आहे. सरासरी चार – पाचशे लोकसंख्या असलेल्या या दोन्ही वस्तीत नागरिकांच्या सोयीसाठी पाटण नगरपंचायतीने सार्वजनिक स्वच्छालय बांधली आहेत. मात्र हि स्वच्छालय आजच्या घडीला “ना घर का.. ना घाट की..” अशी झाली आहेत. गेले कित्येक दिवस हि स्वच्छालय दुर अवस्थेमुळे वापराविना खितपत पडली आहेत. स्वच्छालयावरील पत्रा वाऱ्याने उडून गेला आहे. काही ठिकाणी भिंतीला भेगा पडून ढासळण्याच्या मार्गावर आहेत. दरवाजे खिळखिळी झाली आहेत तर स्वच्छालयासमोर घाणीचे समराज्य पसरले आहे. “ना पाण्याची सोय आहे.. ना बसण्याची व्यवस्था आहे” अशा परस्थितीत येथील अबालव्रुद रहिवासी नागरिक नाईलाजाने उघड्यावर स्वच्छास जात आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सार्वजनिक स्वच्छालयाच्या दुरुस्तीसाठी इंधिरानगर येथील रहिवाशांनी पाटण नगरपंचायतीकडे अनेकदा तोंडी व लेखी मागणी केली असता आताकुठे स्वच्छालयाच्या दुरुस्तीसाठी पत्र्याची व्यवस्था झाली आहे. मात्र हि व्यवस्था तातपुरत्या स्वरूपाची नको असून कायमस्वरुपाची व्हावी अशी मागणी होत आहे. कारण पुढील एक – दिड महिन्यात पाऊसाळा सुरु होत आहे. अशा परस्थितीत रहिवासी नागरिकांची स्वच्छाची गैरसोय म्हणजे आणखी भयंकर आजारांना निमंत्रण देणे ठरु नये. ऐवढीच अपेक्षा येथील रहिवासी नागरिकांनी व्यक्त केली आहे.