Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीसातारा शहर शिवसेनेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी

सातारा शहर शिवसेनेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी

सातारा :- सातारा शहर शिवसेनेच्या वतीने सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी गोरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. सध्या संपूर्ण जगभरात कोरोना चे थैमान चालू आहे त्यासाठी सलग 4 लॉकडॉऊन केल्याने सर्व जनता आर्थिक दृष्ट्या त्रासली आहे. नोकरदार, छोटे दुकानदार, मजूर, चाकर, उद्योगधंदे वाले, हातावर पोट असणारे कामगार या सर्वांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे 2 महिन्यात जवळचे पैसे संपले आहे. इथून पुढे जगावे कसे असा प्रश्न उभा आहे त्यातच आता नगरपालिकेची वार्षिक घरपट्टी व पाणीपट्टी यांची नोटीस लोकांना जातील तेव्हा आम्ही सातारा शहर शिवसेनेच्या वतीने विनंती करतो की सन 2019-2020 ची घरपट्टी व पाणीपट्टी आपण नगरपालिका हद्दीतील 1000 चौ.फूटाच्या आतील मिळकती धारकांचे चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी व नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती आशा मागणीचे निवेदन सातारा शहर शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपशहर प्रमुख शिवाजीराव इंगवले यांनी दिले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular