वार्ताहर
परळी
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र परळी येथे डॉ अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी व मा डॉ सुभाष चव्हाण जिल्हा शल्यचिकित्सक यांचे हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमास मा.कमलताई जाधव जिल्हा परिषद सदस्या, मा.श्री अरविंदबापू जाधव उपसभापती पं.स.सातारा, मा.विद्याताई देवरे पं.स.सदस्या, मा.डॉ प्रमोद शिर्के जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी, मा.डॉ डी.जी.पवार तालुका आरोग्य अधिकारी तसेच डॉ.सचिन यादव व डॉ उर्मिला बनगर आणि प्रा आ केंद्रा परळी येथीलसर्व कर्मचारी उपस्थित होते.
प्रा आ केंद्र कार्यक्षेत्रात ३५ बुथवर ७२ कर्मचाऱ्यांव्दारे व ४४ आयपीपीआय टीम व्दारे पल्स पोलिओ लाभार्थ्यांना लस पाजण्याचे नियोजन करणेत आले आहे.यावेळी सर्व मान्यवरांकडून १०० टक्के पोलिओ लस घेणेबाबत आवाहन करण्यात आले.