सातारा :- महाबळेश्र्वर येथील क्षेत्र महाबळेश्वर ते ऑर्थरसीट या मुख्य रस्त्यावर सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचे दृश्य पाहावयास मिळाले महाबळेश्वरकर नागरिकांसह पर्यटकांनी या बर्फवृष्टीसह बदललेल्या या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला
गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात पावसाची संततधार सुरु आहे तर आज बुधवारी दुपारी शहरासह परिसरात पावसाने एक ते दीड तास धुवाधार बॅटिंग केली तर क्षेत्र महाबळेश्वर ते ऑर्थरसीट पॉईंट पर्यंतच्या रस्त्यावर सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले रस्त्यांवर लांबपर्यंत बर्फाची चादर पसरल्याचे दृश्य पाहावयास मिळाले अनेक हौशी पर्यटकांनी या बर्फात मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला तर रस्त्यांवर लांबपर्यंत पडलेल्या बर्फाचा खच यांमुळे मात्र वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
महाबळेश्वरात जोराच्या पावसासह बर्फाची चादर..
RELATED ARTICLES