मेढा / प्रतिनिधी :- गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या मेढा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोपटवाडी ( पोलीस वसाहत) नजीक असणाऱ्या रहिवाशांच्या रस्त्यासाठी राज्याचे गृहमंत्री ,ना. शंभुराज देसाई यांनी ग्रीन सिग्नल दिला.
राष्ट्रवादीचे जिल्हापरिषद व नियोजन मंडळाचे सदस्य दिपक ( बापू)पवार यांच्या नेतृत्वाखाली वे०णामाईचे अध्यक्ष , पत्रकार सुरेश पार्टे , मेढयाचे माजी सरपंच नारायणराव शिंगटे , माजी उपसरपंच प्रकाश कदम , राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंकुश सावंत , युवा नेते अशोक साळुंखे , सामाजीक कार्यकर्ते अमजत पठाण या शिष्ट मंडळाने ना. शंभुराज देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून नागरीकांची व्यथा त्यांच्या समोर मांडली. व रस्त्याच्या अडचणी बाबतचे निवेदनही त्यांना या प्रसंगी देण्यात आले. सदरचा रस्ता हा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जात असून त्याचा फायदा नजीकच्या रहिवाशी नागरीकांबरोबरच पोलीस वसाहत ,व पोलीस स्टेशन बरोबरच , पोलीस स्टेशनमध्ये कामानिमीत्त येणाऱ्या नागरिकांना ही होणार आहे. गेल्या ५० वर्षा पूर्वी ज्या स्थानिक शेतकऱ्यांनी आपली सातारा मेढा महाबळेश्वर रोड लगतची सोन्यासारख्या भावाची जमीन पोलीस वसाहत व पोलीस ठाण्यासाठी दिली त्यांनाच आज गेल्या ५० वर्षापासून २स्त्यासाठी याचना करावी लागत आहे.
सदर प्रश्नाची सविस्तर माहीती घेतल्या नंतर गृहमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी तातडीने जिल्हा पोलीस प्रमुखांना अहवाल सादर करण्याच्या सुचना करून संबधीत नागरीकांच्या रस्त्याची अडचण सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांचा पोपटवाडी ( पोलीस वसाहत ) अंतर्गत रस्त्यासाठी ग्रीन सिग्नल
RELATED ARTICLES