सातारा :- सातारा शहर व नव्याने नगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या परिसरामध्ये भयंकर प्रमाणात डेंगू मलेरिया सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर त्वरित उपाययोजना तसेच औषध फवारणी धूर फवारणी करण्यात यावी व शहरात विविध भागांमध्ये रस्त्यात पडलेले खड्डे बुजवण्यात यावे व शहरातील स्वच्छता मोहीम गतिमान करण्यात यावी तसेच डेंग्यू मलेरिया रोगांचा प्रसार होऊ नये यासाठी प्रसार माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, सध्या शहरात कोरोनाचे अनेक रुग्ण असून त्यापासून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, त्यातच डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांनी डोके वर काढले आहे , याचा मोठ्या प्रमाणात त्रास सातारा शहरातील नागरिकांना सोसावा लागत आहे तरी याबाबत आपण त्वरित उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराकडून आपल्या विभागावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सातारा मनसे तर्फे देण्यात आला.
यावेळी शहर अध्यक्ष श्री राहुल पवार, महिला शहराध्यक्ष सौ वैशाली शिरसागर, शहर उपाध्यक्ष भरत रावळ आदर शेख वैभव वेळापुरे, ऍड मुस्ताक बोहरी, गणेश पवार, सुषमा गायकवाड, गीतांजली मोरे, यासह मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी *पालिकेचे उपनगराध्यक्ष श्री श्री मनोज शेंडे यांच्या थेट घरच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले*
त्यास प्रतिसाद म्हणून निवेदनाची दखल घेऊन श्री मनोज शेंडे यांनी त्वरित संबंधित विभागाला फवारणी करण्याचे आदेश दिले…

                                    