मेढा/प्रतिनिधी ःशिष्यवृत्ती परीक्षेची अखंडीत यशस्वी परंपरा व गुणवत्तापूर्ण नवोपक्रम राबवणारी ओझरे शाळा ही जावलीच्या शिरोपेचातील मानाचा तुरा आहे.असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी-मा. कल्पना तोडरमल यानी आज काढले.जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरे, तालुका. जावली या शाळेने सलग तिसऱ्या वर्षी उत्तम यश संपादन केले.
यावर्षी शाळेतून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दहा विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील नऊ विद्यार्थी पात्र झाले तर शिष्यवृत्ती धारक म्हणून कु.स्वराली सुनील सावंत (256 गुण) व कु.वेदिका संजय जंगम (250 गुण) या 2 विद्यार्थिनींची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली, तसेच कार्तिकी जंगम, हर्षद चव्हाण, रुद्र जंगम, आर्या लकडे, अर्णव मर्ढेकर, ईश्वरी मर्ढेकर, अर्णव जंगम, मेघराज मर्ढेकर या विद्यार्थ्यांनी देखील उत्तम गुण मिळवून यश संपादन केले. मार्गदर्शक शिक्षक म्हणून सौ संगीता तानाजी मस्के, नेहा जाधव, आण्णासाहेब दिघे, यांचे योगदान मोलाचे ठरले तर माजी मुख्याध्यापक श्री विजय धनावडे, मुख्याध्यापक श्री बळवंत पाडळे, केंद्रप्रमुख श्री संपत धनावडे साहेब, विस्तार अधिकारी श्री.चंद्रकांत कर्णे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना तोडरमल मॅडम यांनी शाळेच्या या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षिका संगीता मस्के मॅडम व यशस्वी विद्यार्थी यांचे कौतुक केले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील यशासाठी सर्व तज्ञ मार्गदर्शक जावली तालुका यांचे सहकार्य लाभले. शाळेच्या या उज्वल यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दत्तात्रय लकडे, सरपंच-अजित मर्ढेकर, उपाध्यक्ष-दर्शना कदम ,तसेच सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती ओझरे,ग्रामपंचायत ओझरे,ग्रामस्थ व सर्व तरुण मंडळे ओझरे यांनी अभिनंदन केले.
गुणवंत विद्यार्थी घडविणारी राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त ओझरे शाळा
RELATED ARTICLES