मेढा ( प्रतिनिधी ):- प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सभासदांची हित पाहणारी आहे बँकेच्या माध्यमातून
सभासदांनी आपली प्रगती करावी असे उद्गार बँकेचे व्हा. चेअरमन शशिकांत सोनवलकर यांनी काढले.
मेढा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र बोराटे , नूतन सभासद गणेश गायकवाड, अमोल डोईफोडे आदी उपस्थित होते.
अधिक बोलताना त्यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहीणी असणारी आणि सभासदांची हित जपणारी आपली प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आहे. विद्यमान संचालक मंडळ आपली विविध ध्येय धोरणे राबवत असून सभासदांची आणि बँकेची प्रगती होण्याकरिता कटीबद्ध असून बँकेची विविध प्रकारची कर्ज आणि व्याजदर यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करीत असल्याने बँक प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे.बँकेची भूमिका नेहमी पारदर्शी राहील या करीता संचालक मंडळ आपली ध्येय धोरणे सभासद यांचे समोर मांडत आहेत. बँकेच्या प्रगती मध्ये सभासदांचा महत्वाचा सहभाग असून नवीन सभासद वाढविणे कामी बँकेच्या विविध शाखंतून उत्तम प्रकारे कामकाज सुरू असून त्यांमुळे बँकेच्या भाग भांडवल, गुंतवणूक यावर चांगला परिणाम होणार असल्याचे सूचित केले.
प्रारंभी बँकेचे व्हा. चेअरमन शशिकांत सोनवलकर यांचे स्वागत बँकेचे अंतर्गत तपासणी अधिकारी संजय सोनावणे यांनी तर संचालक राजेंद्र बोराटे यांचे प्रभारी शाखाप्रमुख नामदेव जुनघरे यांनी शाल.,श्रीफळ देवून स्वागत केले.यावेळी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचेे कर्मचारी अमन खान, तुषार बोडरे, अभिजीत शिंगटे, तुषार गोळे उपस्थित होते.
सभासद हित पाहणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या माध्यमातून शिक्षकांनी प्रगती करावी-: शशिकांत सोनवलकर
RELATED ARTICLES