सातारा :- कंग्राळकर अण्णांनी बघता बघता नव्वदी पार केली. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांचे ऋषितुल्य व्यक्तीमत्व आहे. अण्णांच्या गौरवग्रंथात बारीक सारीक नोंदी आढळून येतात. सध्याच्या पिढीला दिशादर्शक असा हा ग्रंथ आहे. आदर्श व्यक्तीमत्व कसे असावे हे या पुस्तकातून दाखवले गेले आहे असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आ.ब. कंग्राळकर यांच्या सत्कार सोहळा व गौरवग्रंथाच्या प्रकाशन सोहळय़ावेळी ते बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंठे, डॉ. सुभाष दर्भे, अरुणकाका गोडबोले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, अमित कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अजितदादा म्हणाले, अजित पवार म्हणाले, कंग्राळकर अण्णांनी बघता बघता वयाची 90 वर्ष पार केली. ज्ञान दानाचे कार्य करणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व अण्णांचे आहे. व्यक्तीशः मी माझ्यावतीने मनापासून त्यांचे अभिष्टचिंतन करतो. दिर्घयुष्य लाभावे अशी प्रार्थना करतो. समाजात कर्तृत्ववान पिढी घडवण्यासाठी अण्णांसारखा शिक्षक लाभले पाहिजेत. कंग्राळकर कुटुंबिय आणि पवार कुटुंबांचे जवळचे स्नेह आहे. या ग्रंथात वंशावळ, गोत्र, जात वैगेरे सर्व काही लिहिले आहे. हाडाचा शिक्षकच असे लेंखन करु शकतो. न्यू इंग्लिश स्कुलमधील त्यांच्या कारकीर्दबद्दल बारीकसारीख लिहल आहे. अगदी ट्रिप काढल्याची नोद ठेवली आहे. हा गौरव ग्रंथ समाजासाठी आदर्श प्रेरणादायी आहे. त्या काळात गुगल सारखी माहिती उपलब्ध नव्हती. अण्णांनी अनेक पिढय़ा घडविल्या, त्यांचा हा ग्रंथ आपल्या मनातील नोंदी ठेवणारा ग्रंथ आहे. नवीन पिढीने आत्मसात करण्यासारखा आहे. अण्णांच्याबद्दल 38 जणांनी आपले अनुभव लिहले आहेत. निष्काम कर्मयोगी असे अण्णा आहेत. आज अण्णा नव्याने गौरव ग्रंथामुळे कळले आहेत, आदर्श जीवन कसे जगावे हे शिकवणारे पुस्तक आहे. त्यांच्यावर आर एसएसचा प्रभाव आहे. सर्वाना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे. अण्णा ना उत्तम दिर्घयुष्य लाभो शतक पूर्ती कार्यक्रमाला आपण सगळय़ांनी उपस्थिती लावू अशी प्रार्थना त्यांनी केली.
कंग्राळकर अण्णांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना यावेळी मांडल्या. त्यांनी बोलताना सांगितले की नवीन मराठी शाळा सोसायटीची परवानी नसताना काढली. इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱयांसाठी पतपेढी काढली, असे सांगत त्यांनी शाळेच्यावेळी घडलेल्या गोष्टी कथन केल्या. यावेळी अरुणकाका गोडबोले, डॉ. सुभाष दर्भे, कंठे यांनी आपली मनोगते मांडली. गौरव ग्रंथाचे मुद्रक संदेश शहा आणि प्रशांत गुजर यांचा ही सन्मान यावेळी करण्यात आला.