पुसेगाव: राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेमध्ये पुसेगाव मधील भवानीनगर या ठिकाणी असणाऱ्या प्राथमिक शाळाने घवघवीत यश संपादन केले. इयत्ता दुसरीच्या तब्बल २१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून आपली योग्यता सिद्ध केली.
पुसेगाव येथील भवानीनगर या ठिकाणी असणारी जिल्हा प्राथमिक शाळा आपल्या गुणवत्तेसाठी गेल्या काही वर्षात नावारूपाला आली आहे. विविध शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आजवर अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामुळे पुसेगाव व परिसरातील अनेक पालक या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. शाळेच्या गुणवत्तेमुळे परगावतील सुद्धा अनेक पालक आपल्या पाल्याला या शाळेमध्ये दाखल करत असल्याचे दिसून आले आहे. गुणवत्ता आणि दर्जा याच्याशी कोणतेही तडजोड न करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण होत असल्याचे विविध परीक्षेच्या निकालावरून स्पष्ट दिसत आहे.
मागील वर्षी इयत्ता दुसरीसाठी झालेल्या मॉडेल एज्युकेशन आणि सोशल इन्स्टिट्यूट, सातारा या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेमध्ये इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग या संपादन केले. २०० पैकी झालेल्या परीक्षेमध्ये १५० पेक्षा जास्त गुण २१ विद्यार्थ्यांनी मिळवले यामध्ये गायत्री घनवट या विद्यार्थिनीने १९८ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर मृण्मयी चव्हाण, समर्थ चव्हाण,स्वरा सावंत, हिंदवी शिंदे , आयर्न पवार,प्रज्ञेश अब्दागिरी, वेदिका जाधव, वैष्णवी कदम,स्वरा पवार, ज्ञानेश्वरी देशमुख, प्रार्थना सूर्यवंशी, रोही जाधव, यश काळे,अंकिता देशमुख, ईश्वरी मोरे, अपर्णा कांबळे, सिद्धी घोरपडे, कार्तिकी थोरात, शौर्य कांबळे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
इयत्ता दुसरीचे वर्गशिक्षक सुभाष नाळे,भोसले मॅडम, सावंत मॅडम, सूर्यवंशी मॅडम आधी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले.