
सातारा ता,2(प्रतिनिधी) जावळी तालुक्यात अवैध रित्या मद्य विक्री तसेच विनापरवाना मद्य सेवन केल्याबद्दल सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दोन ठिकाणी छापा कारवाया करण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी कारवाई करून सुमारे 96 हजार 310 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जावळी तालुक्यातील सह्याद्रीनगर पोस्ट कुसुंबी येथील हॉटेल साह्यगिरी येथे विना परवाना मद्य सेवन केल्याबद्दल तसेच अवैध रित्या मद्य विक्री केल्याबद्दल हॉटेल चालकसह मद्य पिणार्यांवर कारवाई करण्यात आली. याबाबत हॉटेल चालक जगन्नाथ रामचंद्र पवार रा.सांगवी ता.जावळी जि.सातारा यानी विनापरवाना मद्य विक्री केल्याचे छापा कारवाईत स्पष्ट झाले. तसेच विनापरवाना मद्य सेवन करणारे अमोल किशोर कांबळे,रा. इचलकरंजी, ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर,सुनिल विश्वनाथ चव्हाण रा.अपशिंगे,सुमेध रेमश गाडे, वसीम आक्रम जमालशेट मोमीण दोघे ही रा. भणंग ता.जावळी यांचे विरूध्द महाराष्ट्र दारू बंदी कायद्या 1949 चे कलम 68 अ,ब अन्वये कारवाई करण्यात आली. सर्व संशयीतांना मेढा ता.जावळी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने हॉटेल चालक जगन्नाथ पवार यांस 25 हजार रूपये, व विना परवाना मद्य पिणार्या ग्राहकांवर प्रतयेकी रूपये 1 हजार पाचशे असा एकुण 31 हजार रूपयांचा दंड ठोठावला. याकामी सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती जे.आर.इंगळे यांनी कामकाज पाहिले. यासोबतच जावळी तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणारे विकास पांडुरंग शिंदे , रा . म्हावशी ता . जावळी , गणेश विष्णुदास धनावडे रा . करंजे ता . जावळी , दिग्वीजय संजय पवार रा . म्हावशी ता . जावळी यांच्या दारुविक्री अड्डयावर छापा कारवाई करून देशी , विदेशी दारु , बिअरच्या साठयासह, एक दुचाकी वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागा सातारा यांनी जप्त केले . वरील दोन्ही कारवाईमध्ये एकूण 96 हजार तीनशे दहा रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्र्याच्या जिल्हयात विशेषत: जावळी तालुक्यात अवैध दारू विक्री व विनापरवाना मद्य सेवनाचे प्रकार घडत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग अॅक्टिव्ह मोड मध्ये आले असुन. त्यांच्यावर अंकूश घालण्याचे काम सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रमती किर्ती शेडगे करत आहेत. सावधान अवैध रित्या दारू विक्री व मद्य सेवनकरणार्यांवर आता कायदेशीर कारवाईच नाही तर दंडात्मक कारवाई देखील होणार असल्याचा इशाराच जावळीसह सातारा जिल्हयातील अवैद्य दारू विक्री व विनापरवाना सेवन करणार्याना सातारा राज्य उत्पादन शुल्कच्या वतीने देण्यात आला आहे.
चौकट : जावळीत गेेल्या पाच दिवसांपासून धडाक्यात कारवाई सुरू असल्याचे चित्र आहे. अवैध रित्या मद्य विक्री,तसेच विनापरवाना मद्य सेवनाच्या वाढत्या घटनांमुळे आता राज्य उत्पादन शुल्क मंत्र्याच्या जिल्ह्यात चाललंय तरी काय असा सुर आळविला जात असताना. सातारा राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांनी राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्रराज्य मुंबईचे आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त कोल्हापूरचे विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाक्यात कारवाई सुरू केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.