सातारा ता,७ (प्रतिनिधी) सनदी अधिकारी व लोकप्रिय मंत्र्यांच्या नावाचे पोस्टर हातात घेऊन एका महिलेचा सातारा पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेरचा टाहो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेला दहा ते पंधरा दिवस उलटून गेले मात्र याची कुठचे वाच्यता करण्यात आली नसल्याचे नवल वाटले. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालया बाहेर अज्ञात महिला,तिचा मुलगा व सोबत एक वृद्ध महिला अश्या तिघा जणांनी एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. गेले ८ वर्षे मला अन्नाला महाग केलं. न्याय मिळाला नाही ह्यांच्या बापाचे राज्य आहे का म्हणत माझे महाबळेश्वर चे घर हडपले, माझी कंपनी हडपली, मुलाची नोकरी घालवली अश्या आरोपांची सरबत्ती करत महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. माझ्या आईवर त्या दोघांनी वाईट नजर ठेवली आहे. असा आरोप मुलाने केला आहे. दरम्यान घडलेल्या प्रकरणात महिलेला व मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले व पुन्हा सोडून दिले असल्याने नेमकं या प्रकरणाचं पुढं झालं काय याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हायरल झालेल्या व्हिडीओ वृत्तांनंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून सातारा पोलिसांच्यावर दबाब टाकण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला असून त्यांच्या कर्तव्य दक्षतेवर सवाल उपस्थित होऊ लागला आहे. नेमकी ही महिला कोण? सनदी अधिकाऱ्यां सोबत लोकप्रिय मंत्र्यांवर केलेल्या आरोपांच नेमकं सत्य काय हे समोर आलं पाहिजे अश्या चर्चा आता जिल्ह्यात रंगल्या असून. या आरोपबद्दल आता पोलीस प्रशासन यासह संबधित सनदी अधिकारी व मंत्र्यांची भूमिका काय या कडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
त्या अज्ञात महिलेला तिच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र तीच पुढं काय झालं तीन केलेल्या आरोपबद्दल पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली का? किंवा त्याबद्दल नेमका तपास सुरू आहे का? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. १५ दिवस लोटले तरी याबाबत पोलिसांनी केलं काय असा प्रश्न असून. त्या महिलेची तक्रार दाखल केली का नाही. अथवा त्या महिलेवर गुन्हा दाखल केला का नाही अश्या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत.