सातारा दि ९ – समाजसेवा अनेक तऱ्हेने करता येते परंतु शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू
विद्यार्थ्यांना जात-पात न बघता सर्व थरातील सर्व जाती-धर्माच्या मुलांना मदत करणे हा एक अतिशय वेगळा पॅटर्न गोडबोले कुटुंबीयांनी रा ना गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या माध्यमातून राबविलेला आहे आणि विशेष म्हणजे गेली 53 वर्षे सातत्याने ते ही मदत करतात दानशूरता दुर्मिळ असतो आणि सातत्याने ती करत राहणे त्याहून दुर्मिळ असते म्हणून गोडबोले कुटुंबीयांचे अभिनंदन करावं तेवढं थोडेच आहे सुदैवाने आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध आहे कर्मवीर भाऊराव आण्णांपासून त्यांचे वडील बन्याबापू आणि माझे वडील सुद्धा संबंधित होते आणि तो आजही चालू आहे , अगदी पुढच्या पिढीतही सुरू आहे याचा मला विशेष आनंद वाटतो असे विचार सातारा येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू डॉक्टर मोहन पाटील यांनी मांडले
रा.ना गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने समर्थ सदन येथे झालेल्या शैक्षणिक मदत वाटपाच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते नववी पर्यंतच्या 170 विद्यार्थ्यांना मिळून एकूण 1 लाख 60 हजार रुपयाची मदत याप्रसंगी देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मोहन पाटील , डॉ धनंजय बोधे , मॉडर्न बिल्डर्सचे सतीश गिजरे आणि इन्कमट्याक्स ऑफिसर जयवंत चव्हाण हे उपस्थित होते. सतीश गिजरे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी या मदतीचा योग्य उपयोग करावा असं सांगितलं तर डॉ. धनंजय बोधे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगला करावा आणि आपला आरोग्य सांभाळनण्यावरही भर देऊन नियमित व्यायाम करावा असं सांगितलं , जयवंत चव्हाण म्हणाले की मी आयकर अधिकारी आहे आणि जवळजवळ गेली पंधरा वर्षे सातत्याने मी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतो आणि मला एक वेगळा आनंद माझ्या हस्ते मदत प्रदान करताना होतो,मी गोडबोले कुटुंबीयांना या बद्दल धन्यवाद देतो
प्रास्ताविक डॉ अच्युत गोडबोले यांनी केले आणि ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. प्रद्युम्न गोडबोले यांनी सूत्रसंचालन केला तर ट्रस्ट तर्फे शैक्षणिक मदतीचे वाटप करण्याचा हा दुसरा टप्पा आहे , पहिल्या टप्प्यात बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनामदत देण्यात आली आणि पुढच्या तिसऱ्या टप्प्यात दहावी ते कॉलेज आणि संस्थांना मदत करण्यात येणार आहे अशी माहिती अरुणा गोडबोले यांनी दिली , एकूण 450 विद्यार्थी व 15 संस्था मिळून सुमारे पाच लाखाची एकूण मदत देण्यात येणार आहे असं ट्रस्टचे विश्वस्त अरुण गोडबोले यांनी सांगितले