भेकवली : जावली व महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठया उत्साहात संपन्न झाला.
दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पाडा सुलेवाडी तालुका जावली, आदिवासी पाडा भेकवली, आदिवासी पाडा कासवंड, आदिवासी पाडा वारसोळी कोळी, आदिवासी पाडा क्षेत्र महाबळेश्वर, आदिवासी पाडा टेकवली, येथील सर्व आदिवासी बांधवांनी आपापल्या आदिवासी पाड्यावर आदिवासी दैवत महादेव, वाघदेव व आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमांचे पूजन करुन सर्व आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे बांधव व महिला भगिनी भोसे खिंड येथे एकत्र आले.
महाबळेश्वर तालुका नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांची भोसे खिंड ते पाचगणी रॅली काढण्यात आली.
पाचगणी येथे रॅली आल्या नंतर आदिवासी भगिनींनी आपल्या पारंपारिक पद्धतीने फेर धरून आदिवासी गाणी म्हणून उपस्थित जनसमुदायाला मंत्र मुग्ध केले, आदिवासी बालकांनी पारंपारिक वेषभूषा करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, हर हर महादेव, आदिवासी क्रांतिकारकांचा जयघोष करीत रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचल्या नंतर राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तमाम आदिवासी बांधाच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले.
व वाई येथे संपन्न होणार्या जागतिक आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला सर्व आदिवासी बांधव मार्गस्थ झाले.
जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES