कराड ः इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक व इयत्ता-आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तेत आग्रही असणाऱ्या श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग यश प्राप्त केले व पुन्हा एकदा कन्याशाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले.
यामध्ये इयत्ता पाचवी मधील कु. सानवी खराडे हिने तालुक्यात 4 था व जिल्हा गुणवत्ता यादीत सर्वसाधारण विभागात 42 वा क्रमांक मिळवला. तसेच कु. आराध्या जाधव हिने तालुक्यात 14 वा व जिल्हा गुणवत्ता यादीत सर्वसाधारण विभागात 114 वा क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता आठवी मधील धनश्री संकपाळ हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात 7 वा व जिल्हा गुणवत्ता यादीत 82 वा क्रमांक संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या. तसेच शिष्यवृत्तीसाठी श्री मळाई शिष्यवृत्तीच्या प्रमुख डॉ. स्वाती थोरात यांनी सुरु केलेला श्री मळाई शिष्यवृत्ती पॅटर्नचे महत्व अधोरेखित केले. व असे उत्तुंग यश प्राप्त करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सविता कोळी, प्रमिला शेलार, प्रकाश पाटील, सिताराम कोळेकर, करुणा शिर्के, कविता थोरात, सरिता रसाळ, श्वेता शिंदे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक वसंतराव चव्हाण, संचालिका डॉ. स्वाती थोरात, संचालक संजय थोरात व कन्याशाळेचे हितचिंतक पालक वर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कन्याशाळा मलकापूरचे उत्तुंग यश
RELATED ARTICLES