सातारा: इनरव्हील क्लब ऑफ कराडचा ३५ वा पदग्रहण समारंभ कराड येथे संपन्न झाला. यावेळी २०२४-२५ करिता नम्रता कंटक यांनी क्लबच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. तसेच व्हाईस प्रेसिडेंट पदी अनघा बेर्डे, सचिवपदी वैशाली पालकर, आयआयपी पदी सीमा पुरोहित, खजिनदारपदी रूपाली डांगे, आयएसओ पदी अनुराधा टकले, संपादक पदी अदिती पावसकर, सहसचिव पदी डॉ.अर्चना औताडे, सीसीपदी स्नेहल देशपांडे, सीएलसीसी पदी संगीता पालकर यांनी पदभार स्वीकारला. तसेच एक्झिक्यूटिव्ह सदस्य म्हणून चार्टर् प्रेसिडेंट रेखा काशीद, स्मिता शिराळकर, सुजाता बेंद्रे, आशा भिसे, अश्विनी शेवाळे, डॉ. मनिषा जाधव यांनी पदभार स्वीकारला.
वनवासी कल्याण आश्रमच्या सदस्या, अनेक वर्षे समाजसेवा करत असणाऱ्या सौ. प्रतिभा प्रभाकर ताम्हनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांचे परिवारजन कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रसज्ञा जोशी यांनी ललिताम्बिकास्तोत्र ही भरतनाट्याची कला सादर केली. त्यानंतर झालेल्या विशेष कार्यक्रमात २०२३-२४ वर्षात ९ बक्षिसे मिळाली त्याबद्दल क्लब सभासदांनी पारितोषिक विजेत्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
इनरव्हील क्लब कराड हा एक प्रथितयश क्लब आहे, याची पावती म्हणून या पदग्रहण सोहळ्याच्या प्रसंगी कराडमधील वैष्णवी कुंभार, डॉ.मीना चव्हाण,डॉ. रेणुका माने या तीन नवीन सदस्यांनी कराड क्लबमध्ये पदार्पण केले. या सर्व नवीन सदस्यांचे इनरव्हील क्लबची पिन लावून स्वागत करण्यात आले.
यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लबचे १०१ वे वर्ष असून डिस्ट्रिक्ट ३१३ चे ४० वे वर्ष हे रूबी वर्ष आहे. दरम्यान इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या ३५ व्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळणे ही आनंदाची गोष्ट असल्याचे तसेच डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ.शोभना पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली सेलिब्रेट लाईफ व हार्टबीट ऑफ हुमॅनिटी या दोन उद्दिष्टांना समोर ठेवून त्यावर काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा नम्रता कंटक यांनी सांगितले.
सौ. ताम्हनकर यांनी समाजसेवा फार सोपी असते फक्त त्यासाठी दृष्टी असावी लागते हे सांगताना काही उदाहरणे दिली. स्वानुभव कथन केला. प्रेरणा दिली आणि मिळून काम करण्याची आशा निर्माण केली.पीपी ऋता चाफेकर यांनी सूत्रसंचालन तर व्हाइस प्रेसिडेंट अनघा बर्डे यांनी आभार मानले.
फोटो :- इनरव्हील क्लब ऑफ कराडचा ३५ वा पदग्रहण समारंभ कराड येथे संपन्न झाला. यावेळी उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकारी