कोरेगाव , दिनांक 26:-
सातारा लोणंद या सर्वाधिक वहातुकीच्या राष्ट्रीय राज्य मार्गावरील वाठार स्टे देऊर गावा दरम्यान तळहिरा ओढ्यावरील असलेला ब्रिटिश कालीन पुलावर सद्या मोठ मोठे खड्डे पडल्याने या पुलास धोका निर्माण झाला आहे या बाबत तत्काळ दुरस्ती न केल्यास हा पूल पडण्याची शक्यता वहातुकदार व्यक्त करत आहेत
सातारा लोणंद राज्य मार्गाचे तीन वर्षापूर्वी रियल इन्फ्रा या कंपनीने या मार्गाचे काम पूर्ण केलं यानंतर तीन वर्ष या कंपनीने या मार्गाची देखबाल दूरस्ती काम केलं आता या रस्त्याची देखभाल दूरस्तीचे काम हे राष्ट्रीय राज्यमार्ग विभागाकडे आहे..आत्र या विभागाकडून काम करण्यास टाळाटाळ केली जात आहे
सातारा लोणंद राज्यमार्ग काम दर्जात्मक झाले असले तरी सद्या या मार्गावरील वाढे आणि तलहिरा या ठिकाणी असलेले ब्रिटिश कालीन पुलावर खड्डे पडल्याने हे पुल धोकादायक बनले आहेत
सातारा लोणंद या मार्गावर सद्या मोठ्या प्रमाणात अवजड वहातुक सुरू आहे त्यामुळे या रस्त्यावरील या पुलाची तत्काळ दूरस्ती करण्याची भूमिका संबधित विभागाने घ्यावी अशी मागणी होत आहे.