सातारा: अविज पब्लिकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इनमा प्रा.लि.,पुणे यांचेवतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ‘बँको पुरस्कार -2017’ जाहीर झाला आहे. अविज पब्लिकेशन व गॅलेक्सी इनमा प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार संपूर्ण भारतातील जिल्हा सहकारी बँकेचा व्यवसाय रू.पाच हजार कोटीपेक्षा जास्त असणार्या बँकातून या पुरस्काराकरिता बँकेची निवड केलेली असून यामध्ये ठेवी, कर्जे व निधी नियोजन आदी बाबींचा समावेश आहे.
सातारा जिल्हा बँकेस या संस्थेने सन 2013 व 2014 मध्ये तसेच सहकारी बँकिंग तंत्रज्ञानातील उल्लेखनीय कामगिरीबाबत प्रथम क्रमांकाचा बँको टेक्नॉलॉजी पुरस्कार – 2016 व ठेव संकलनाकरिता द्वितीय क्रमांकाचा पुरस्कारने गौरविले आहे. या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना.रामराजे नाईक निंबाळकर, सुनील माने, लक्ष्मणराव माने, आ.शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, विलासराव पाटील, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, दादाराजे खर्डेकर यांचेसह सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक एस.एन.जाधव, एम.व्ही.जाधव, सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सेवक वर्ग, गटसचिव यांनी बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्काराबद्दल बँकेचे ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार आदींनी समाधान व्यक्त केले.