सातारा : सातारा शहरातील पोवई नाका येथे उड्डाणपुलाचे (ग्रेड सेपरेटर) बांधकामाची सुरुवात करण्यात येणार असून यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल केला आहे.
पोवई नाका ते सभापती निवासमार्गे तहसील कार्यालय हा रस्ता सर्व वाहनांना एसटी स्टॅन्डकडे जाण्यासाठी बंद करण्यात येत आहे. बंदी घातल्यानंतर वाहतुकीस पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे : बाँम्बे रेस्टॉरंट , अजंठा चौक तसेच मरीआई कॉप्लेक्स बाजुकडून येणारी वाहतूक एसटी स्टॅन्डकडे जाण्याकरीता कालीदास पेट्रोलपंप-दुध डेअरी-पारंगे चौक या मार्गाचा वापर करतील.
पोलीस मुख्यालय बाजूकडून एस. टी. स्टॅण्डकडे जाणेकरीता प्रिया व्हरायटीज मार्गे किंवा प्राथमिक शिक्षक बँक ते तहसिलदार ऑफिस ( मच्छी मार्केट मार्गे ) एस. टी. स्टॅन्डकडे जाणेसाठी वापर करतील.
प्राथमिक शिक्षक बँक ते तहसीलदार ऑफीस (मच्छी मार्केट मार्ग) हा मार्ग प्राथमिक शिक्षक बँक ते तहसील कार्यालयाकडे जाण्यासाठी एक दिशा मार्ग राहील. एसटी स्टॅन्ड ते शिवाजी सर्कल, रुपसमिर चौक (कालीदास पंप मार्गे) हा मार्ग वाहतुकीसाठी खुला राहिल.