Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीदादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धेत मराठी चित्रपट कलाकारांचा सत्कार ; एकांकिका पाहण्यासाठी...

दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धेत मराठी चित्रपट कलाकारांचा सत्कार ; एकांकिका पाहण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती ; रविवारी सादर होणार 9 एकांकिका

साताराः पळशीची पेटी या मराठी चित्रपटाने फ्रान्स येथील चित्रपट महोत्सवासाठी मजल मारली असून सतारा सारख्या कलासक्त शहरातुन आज नवनवीन कलाकार निर्माण होत आहे ही कौतुकाची गोष्ट आहे. त्याच बरोबर ही स्पर्धा म्हणजे कलाकरांना पालीकेने उपलब्ध करुन दिलेले नवे स्टेज आहे असे उद्गार नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी काढले. कै.श्री. छ.दादा महाराज करंडक राज्यस्तरिय मराठी  एकांकिका स्पर्धेत  शाहू कला मंदिरात कदम यांनी पळशीची पेटी या चित्रपटातील कलाकारांचा विशेष सकार केला यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,स्पर्धेच्या कार्याध्यक्ष सुजााता राजेमहाडिक, कायर्ंवाह कल्याण राक्षे , स्मीता घोडके,  स्पर्धेचे परीक्षक हेमांगी जोशी, नगरसेविका लता पवार, सुमती खुटाळे, यशोधन नारकर, स्नेहा नलावडेे, स्मीता घेाडके, सविता पवार, रजनी जेधे, किशोर शिंदे, विशाल जाधव, अली शेख, राजु भोसले तसेच पालीकेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व नाट्यरसिक मोठया संख्येने उपस्थित होते.
समारंभात चित्रपटातील कलाकार कु.किरण ढाणे, राहूल मगदूम, संदिप जंगम, दिग्दर्शक धोंडिबा कारंडे, प्रशांत इंगवले, ओक गुरव रविंद्र डांगे, गोविंद, संजय डुबल आदी कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना राहुल मगदूम व किरण ढाणे म्हणाले की, पुर्वी या एकांकिका स्पर्धेत काम केले. व पळशीची पेटी हा चित्रपट मिळाला. चित्रपटाचे चित्रीकरणानंतर लागीर झालं जी या मालिकेमध्ये आमची निवड झाली. या स्पर्धा खरोखरच सर्व कलाकारांसाठी एक चांगला टर्निग पॉइंट आहेत. आज आमचा चित्रपट फ्रान्स महोत्सवाला नवीन पदार्पण म्हणून निवड होत आहे. याचा मोठा आनंद  होतो.
या स्पर्धेत ऐतिहासिक दाखले आणि पुराणातील सुरस कथा,प्रेम व्यक्त करणारी कथा,  समाजातील सध्याच्या ज्वलंत अश्या महिलांची छेडछाड आणि तिची होणारी मुस्कटदाबी या सारख्या चर्चील्या जाणार्‍या विषयाच्या एकंाकिका सादर करत अनेक सहभागी स्पर्धक समुहांनी या स्पर्धेची उंची अधिकच वाढवली आहे.
सातारा नगर पालिकेच्या वतीने आयोजीत केेलेल्या तिसर्‍या माजी नगराध्यक्ष कै.श्री. दादा महाराज करंडक राज्यस्तरिय मराठी  एकांकिका स्पर्धेत  शाहू कला मंदिरात या एकांकिका पहायला मान्यवर सातारकर मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आज रवीवारी या स्पर्धेतील सर्वांधिक म्हणजेच तब्बल 9 एकांकिका सादर होणार आहेत .
दरम्यान या स्पर्धेत शनिवारी दुपारी 1 पासून सातारा येथील शो स्टॉपर्सची दि फीअर फॅक्टर, पुणे येथील समर्थ कलाविष्कारची बार्बी, कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटरची तुका म्हणे अवघे सोंग, सातारा येथील थिएटर वर्कशॉपची ती, थिएटर मुव्हमेंटची जॉबलेस, समर्थ संस्थेची कथा बेवारस मुडद्याची, मुंबई येथील कलश थिएटरची अजून चांदरात आहे, मुंबई येथील अभिनव थिएटरची ब्रेन, पनवेल येथील अखिल भारतीय मराठी नाटय परिषद संस्थेची लपंडाव, सातारा येथील तुषार भद्रे स्कूल ऑफ थिएटर संस्थेंची मॅडम याएकांकिका सुरेखपणे सादर झाल्या.
रवीवारी दि. 27 रोजी सादर होणार्‍या एकंाकिका दुपारी 12 वाजता सुरु होणार असून यामध्ये सातारा येथील संवाद संस्थेची अ आईचा ब बाबांचा, मधूमिता कला अकादमीचे हॅलो, दर्पण नाटयसंस्थेची समर्पण, पुणे येथील संक्रमण नाटयसंस्थेची हात धुवायला शिकवणारा माणूस, डोंबिवली येथील रंगावकाशची शेवट, कल्याण येथील नाटयरसिक हो संस्थेची रूढीत रूतलेले सत्व, कल्याण येथील अभिनय संस्थेची युरेका युरेका, कोल्हापूर येथील अ‍ॅडव्हेंचर प्रोडक्शनची फोबिया व मुंबई येथील वीजीकीशा संस्थेची बाहुल्या या एकंाकिका सादर होणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,स्पर्धेच्या कार्याध्यक्ष सुजााता राजेमहाडिक, कायर्ंवाह कल्याण राक्षे , स्मीता घोडके,  स्पर्धेचे परीक्षक हेमांगी जोशी, वामन पंडीत व सुरेश हळदीकर  तसेच सातारचे रंगकर्मी संदिप जंगम, बाळकृष्ण शिंदे, गणेश धावडे ,चित्रा भिसे,हेमांगी जोशी,अजीत करडे, कल्याण राक्षे, ओकार पाठक, प्रशांत इंगवले, पंकज काळे, संदिप कुंभार, अभिषेक परदेशी यांचेसह विविध समित्यांचे सभापती आणि सर्व नगरसेवक विशेष परीश्रम घेत आहेत.
या स्पर्धा रवीवार दि. 27 पयर्ंंत सुरु रहाणार असून अनेक दिग्गज कलाकारंाच्या कलाकृती या मध्ये सादर होणार आहेत.
समांरभास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular