
मायणी :- (सतीश डोंगरे) आज दुपारी पाचवड सह भागात झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे पाचवड येथील विद्युत वाहक दोन खांब मोडून पडले.यामुळे वीजवाहक तारा परिसरात विखुरल्या परंतु पाचवड प्रभारी सरपंच शिवाजी घाडगे यांनी तातडीने या भागातील वीज वितरण विभागाला या घटनेची माहिती दिल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
आज दुपारी अचानक मोठ्या वादळ वाऱ्याला सुरवात झाली . या जोरदार वाऱ्यामुळे पाचवड – विखळे रस्त्यानजीक दिसणारे सिमेंटचे दोन खांब मोडून पडले.वीज वितरण कंपनीने तातडीने या खांबांची दुरुस्ती करून लोकांची ऐन उन्हाळयात होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी पाचवड गावचे प्रभारी सरपंच शिवाजी घाडगे यांनी केले.

