औंध: दिल्ली येथे मनुवाद्यांच्या मार्फत संविधान जाळण्यात आले. तसेच पंढरपूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली याच्या निषेधार्थ सोमवारी औंध येथे समाज जनजागृती फेरी काढून याघटनेचा निषेध करण्यात आला.
तसेच याघटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोरपणे पाऊले उचलण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर औंध गावच्या सरपंच नंदिनी इंगळे यांच्या हस्ते याबाबतचे लेखी निवेदन सपोनि सुनील जाधव यांना देण्यात आले.
यावेळी महात्मा फुले प्रतिष्ठान, जनता क्रांती दल, कट्टर समर्थक ग्रुप तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

