पाटण:- भारतीय संस्कृतीत गोमातेला पुजनीय मानले जाते .गोमाता हे बळीराजाच धन आहे .आधुनिकीकरण व यांञिकिकरण यामुळे हे धन अडचणीत आलेले आहे .परंतु काहीजण हे धन वाचवण्याचा व संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहेत .आंब्रुळे ता.पाटण येथील ७० वर्षे वयाचे शेतकरी जगन्नाथ टोपले लहान मोठया ४०देशी गाईंचा सांभाळ करीत आहेत .त्यांची ३री पिढी गोमातेची सेवा करीत आहे .१५० वर्षाहुन जास्त काळ जोपासलेले सेवेचे व्रत आजही सुरू आहे .गाईंचा पाणी ,चारा व निवारयाचा प्रश्न आजही त्यांना भेडसावत आहे.पाटण येथील आधार जनसेवा सामाजिक संस्थेने पाण्याच्या टाक्या भेट देऊन गोमातेची सेवा केली.
गाईंचा निवारा ,देखभाल ,चारा ,पाणी इ.समस्या बाबत महंताशी फोनवरून चर्चा केली .गोठ्याच्या दुरावस्थेचे फोटो व व्हिडीओ महंताना पाठवुन दिले .याची दखल घेऊन स्वतः महाराजांनी अनुयायांसमवेत पाहणी केली .स्वतः १,००,००० रु. देण्याचे मान्य केले. तसेच श्री.साईनाथ दरबार सामाजिक संस्था खोपोली यांच्या वतीने मदत देण्याचे कबुल केले.लवकरच महंताच्या मदतीमुळे गोशाळा बांधकामास चालना मिळणार आहे .महंतांच्या कृपेने गाईंच्या निवारयाचा प्रश्न सुटणार आहे याचे समाधान वाटते. पाटण ( आंब्रुळे ) येथे ७० वर्षीय शेतकरी जगन्नाथ टोपले आपले सर्वस्व अर्पण करून तीस-या पिढीची परंपरा राखत गाईंचा सांभाळ करत आहेत. हे आधार सामाजिक जनसेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते यांनी श्री साईनाथ दरबार सामाजिक संस्था खोपोली यांच्या निदर्शनास आणून दिले.
महंतानी टोपले यांनी गोमातेची केलेली सेवा प्रत्यक्ष पाहण्याचे ठरविले. गोकर्ण येथील काम आटोपून ते थेट पशुखाद्याची गाडी घेऊनच गोमातेच्या दर्शनासाठी महंत आंब्रुळे येथे आले. धोतर जोडी व पंचा देऊन टोपले यांचा सत्कार केला .आपल्या हातुन गोमातेची अखंड सेवा घडावी व मातेने आशीर्वाद द्यावे अशी मागणी मातेच्या चरणी केली.यावेळी मनोज पाटील,दत्ताञय घाडगे,अभय आफळे ,निलेश कुंभार ग्रामस्थ उपस्थित होते .

