पाटण :- ( शंकर मोहीते ) – पाटण तालुक्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिनी राज्यातील मात्तब्बर नेत्यांनी हजेरी लावली. या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती लक्षवेदक असताना या दोघांच्यात चाललेल्या कान गोष्टी पुढे आलेल्या निवडणूकींची मुठ बांधून गेली. याचा प्रत्यय दोघांच्याही भाषणातुन झाला असुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी होणार हे सांगुन गेली.
या कार्यक्रमात जाहीर व्यासपिठावरुन बोलताना केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने गेल्या साडेचार वर्षात सर्वसामान्य जनतेची कशी फसवणूक व दिशाभुल केली हे सांगताना आता देशाला समविचारी पक्षांची गरज असुन राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे देशाचे नेत्रुत्व करण्यास सक्षम आहेत. देश आणि राज्य अडचणीतुन सोडवायचा असेल तर काँग्रेससह समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेच आहे. असे सांगताना शरद पवार म्हणाले जातीयवादी पक्षांनी देशात वेगळ वातावरण केल होत म्हणून त्यांना या देशातील जनतेने संधी दिली. आज यांच्या कारभाराला साडेचार वर्ष झाली. या साडेचार वर्षात खोट बोलून लोंकांची फसवणुकच केली. खोट बोलायच पण रेटून बोलायच ऐवढाच उध्दोग या सरकारने केला आहे. निवडणुका आल्या की त्यांना राम आणि विठ्ठलाची आठवण येते. हा सगळा खोटेपणा या देशातील जनतेने ओळखला आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यायच ठरवल आहे. असे सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
त्याच वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखिल शरद पवार यांच्या सिग्नलला हिरवा कंदिल देत देशाला आणि राज्याला काँग्रेस सत्तेची गरज आहे. गेले साडेचार वर्ष आपण सर्वजण सत्तेचा परिणाम भोगत आहोत. केवळ लोकांना भुलवण्याचे काम या राज्यकर्त्यांकडून होत आहे. निवडणुका आल्या की कुठ राम मंदिर, कुठ पंढरपुर, कुठ पुतळा अस भावनिक करण्याच काम राज्यात सुरु आहे. आता या भुलथाप्पांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असुन राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रिय काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आसे सांगुन राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी झाल्याचे सुतवाच्छच करुन पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या वर स्तुथीसुमने उधळली. देशाचा क्रुर्षि मंत्री आज कोण आहे हे सांगता येत नाही. उत्क्रुष्ठ क्रुर्षि मंत्री म्हणुन शरद पवार यांची देशाला ओळख आहे. हे सांगताना एकदंरीत राज्यातील दोन्ही काँग्रेसची आघाडीची मुठ श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनी पाटण येथुनच झाली. अशी चर्चा दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यामधुन आहे.