फलटण : बरड, ता, फलटण येथे गोट्या उर्फ गुलाब भंडलकर या व्यक्तीस अज्ञात इसमांनी गोळी घालून गंभीर जखमी केले आहे. या गोळीबारात त्यांना फलटण येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याबाबत घटनास्थळवरून मिळालेल्या माहितीनुसार गोट्या उर्फ गुलाब भंडलकर यास बरड गुणवरे मार्गावर अंदाजे सहा वाजण्याच्या सुमारास सुमारे चार ते पाच अज्ञात लोकांनी गोट्या उर्फ गुलाब भंडलकर यांच्यावर गोळी झाडली यामध्ये भंडलकर हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना फलटण येथील एका खासगी रूग्णालयात तात्काळ हलविण्यात आले खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले असून हल्ला नक्की कोणत्या कारणासाठी व कोणी केला याची अद्याप माहीत मिळाली नसुन पोलिस प्रशासन सदर घटनेचा तपास करीत आहेत.
अज्ञात इसमाच्या गोळीबारात एक जण जखमी
RELATED ARTICLES