Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीजावली तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी ए .ए. मेमन यांची बिनविरोध निवड

जावली तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी ए .ए. मेमन यांची बिनविरोध निवड

केळघरः जावली तालुका तलाठी संघाची बैठक नुकतीच रेव्हीन्यु क्लब येथे आर .बी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी संघाच्या अध्यक्षपदी केळघर मंडलाधिकारी असणारे ए .ए. मेमन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
यावेळी झालेल्या बैठकीस एस .व्ही. अभंग , एस .ऐ . सावंत, यु.टी. घोरपडे, एस .बी. ढाकणे , डी.एन.आंबवणे , डी.एच. मगरे , पी .एम. कुलकर्णी , श्रीमती जी .पी. डेरे , एम.पी. सुतार , पी .आर. पराड , एस .एस. निबांळ आदि उपस्थिती होते .
यावेळी नूतन अध्यक्ष ए .ए. मेमन म्हणाले , महसूल तलाठी कर्मचारी यांच्या अडी-अडचणी सोडविण्याबरोबरच अधिकारी , कर्मचार्‍यामध्ये समन्वय साधत महसूल विभागाच्या विविध योजना समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगितले .
यावेळी संघाच्या बांधणीबरोबरच विविध विषयावर चर्चा करण्यात आली . यावेळी तालुक्यात नव्याने आलेल्या व बदली झालेल्या तलाठी कर्मचार्‍यांचे स्वागत करण्यात आले .प्रारंभी स्वागत डी .एन.आंबवणे यांनी केले . तर पी .एम. कुलकर्णी यांनी आभार मानले .
मेमन यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष डुबल आप्पा , उपाध्यक्ष विठ्लराव सोडमिसे , जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पालवे , सरचिटणीस बी .एम.बहादुरे, तसेच जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष , पदाधिकारी आदिनी अभिनंदन केले .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular