Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीडिजीटल मशिनच्या सहाय्याने पहिल्यांदाच नाडी तपासणीचे काम गौरवास्पद : ना.विजय शिवतारे ;...

डिजीटल मशिनच्या सहाय्याने पहिल्यांदाच नाडी तपासणीचे काम गौरवास्पद : ना.विजय शिवतारे ; सातारच्या कन्याशाळेत अटल महाआरोग्य शिबीरास मोठा प्रतिसाद

सातारा : केंद्र शासनाच्या वतीने आयोजीत केलेल्या आरेाग्य योजनेतील उपक्रमात आज सातारा येथे जिल्ह्यात प्रथमच आयोजीत केलेला डिजीटल मशिनच्या सहाय्याने नाडी तपासणी आणि सर्व रोग निदान चिकीत्सा हा उपक्रम खरोखरच सर्वं समाजासाठी आरेाग्याची नांदी ठरेल असाच आहे. या उपक्रमात जास्तीत सातारा जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी करतो आणि हा उपक्रम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राबवण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करेन अशी ग्वाही साताराचे पालकमंत्री ना.विजय शिवतारे यांनी आज दिली. 
सातारा येथील राजपथावर असलेल्या कन्याशाळा येथे  दि. 5 डिसेंबर आणि  6 डिसेंबर 2018 रोजी अटल महाशिबीराचे आयोजन येथील जिजाउ प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे. या शिबीराचे उदघाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री ना. शिवतारे यांनी वरील उद्गार काढले.
या शिबीरासाठी  प्रकृति जिओ फ्रेश व प्रतिभा हॉस्पिटल, लायन्स क्लब यांचेवतीने विशेष योगदान देण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास सातरा येथील महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संचालक अजीत कुबेर, जिजाउ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.सिध्दी रविंद्र पवार , शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पवार, प्रकृति जिओ फ्रेशचे वैद्य डॉ. सुयोग दांडेकर, कन्याशाळेचे विश्‍वस्त डॉ. आशुतोष पिंगळे,प्रभारी प्राचार्य संजय करपे, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र पवार, नगरसेवक विजय काटवटे, माजी नगरसेवक किशोर पंडीत, लायन्स क्लबचे राहूल शिंदे,डॉ.सुयर्ंकुमार खंदारे आदींची व्यापीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना वैद्य सुयोग दांडेकर म्हणाले की, डिजीटल मशिनच्या सहाय्याने सातारा येथे पहिल्यांदाच नाडी तपासणी करण्यात येत आहे. कन्याशाळेतील विद्यार्थिनींना तसेच सातारा येथील सर्व नागरिकांसाठी हे शिबीर आयोजीत केले आहे.  महिलांना असणारे स्त्री विकार, संधीवात, मणकाविकार, गुडघेदुखी, पाठ दुखी, कंबरदुखी, पचनविकार या आणि इतर सर्व व्याधींवर डिजीटल नाडी परिक्षणाद्वारे अचुक निदान व मार्गंदर्शन करता येते. सदर तपासणी प्रकृती जिओ फ्रेशच्या वतीने पूर्णपणे मोफत केली जात आहे.या परिक्षणामध्ये अचूक पध्दतीने व्याधीच्या मुळाचा ठाव घेता येतो.शरीरातील दोष नेमकेपणाने शोधता येतात,येणार्‍या निष्कर्षातुन समजणार्‍या आहाराच्या मुळ कारणानुसार तसेच जन्मतारखेनुसार योग्य आहार, औेषधोपचार आणि पंचकर्म सुचवता येतात.तसेच सर्वासाठी डिजीटल पध्दत नाडी परिक्षेत मुलांमध्ये असणारा एकाग्रतेचा अभाव,वारंवार उद्भवणारे आजार, संधीवात, मणकाविकार, अधार्ंगवायु, मधुमेह,उच्च रक्तदाब , पचनासंबीधीचे विकार, हाडांचे विकार या आणि अशा विविध समस्यांचे मुळ जाणून घेता येते. या परिक्षणाचा तपशील मोबाईलवरही पाहता येतो. एरव्ही 550 रुपयांमध्ये उपलब्ध असणारी ही तपासणी कन्याशाळा येथे दोन दिवस या शिबीरात मोफत केली जात आहे.तरी या तपासणीचा लाभ सर्वानी घ्यावा .
नगरसेविका व जिजाउ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.सिध्दी रविंद्र पवार  यांनी आपल्या  या लाडक्या शाळेत  मी मोठी झाले आणि आज तुम्हा सर्वांसाठी हा उपक्रम जिजाउ प्रतिष्ठाच्या वतीने आयोजीत करत असल्याचा मोठा आनंद वाटतो आहे. या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.
या शिबीरात प्रतिभा हॉस्पिटलचे डॉ.सोमनाथ साबळे, डॉ.संजय साठे, डॉ. निलेश साबळे,डॉ. अजिंक्य दिवेकर, डॉ. रमेजा शेख, डॉ.उदयराज फडतरे, डॉ. सुर्यकुमार खंदारे आदींनी ह्दयरोग,रक्तदाब,अस्थीरोेग यांची तपासणी करुन रुग्णांना अधिक मार्गंदर्शन केले.तसेच सातारा येथील प्रकृति जिओ फ्रेशच्या डॉ.सौ.दिपाली व्हनवाडे, डॉ.अनुराधा शिंदे, डॉ.श्री.देठे, प्रकृतिचे विभाग प्रमुख जयकुमार बेंद्रे,संपकर्ं अधिकारी वैभव कदम, अक्षय भोसले, निशीकांत लोखंडे,अमोल मुळीक, जास्वंदी चव्हाण आदी या शिबीरासाठी विशेष परीश्रम घेत आहेत.या कायर्ंक्रमाचे सुत्र संचालन सौ. मीनाक्षी वैद्य यांनी केले.तर आभार प्रदर्शन संजय करपे यांनी केले. यावेळी डॉ. कोल्हटकर,डॉ. सुभाष दर्भे, संतोष कणसे, भिकाजी देशमुख, असिफ पटेल यांचेसह कन्याशाळेच्या विविध विभागाचे शिक्षक, पदाधिकारी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular