
सातारा : गारगोठी येथून सकाळी गारगोठी-सातारा या एसटी बसमध्ये अनेक प्रवाशांबरोबर दोन महिलांना बरोबर एक लहान मुलगीही होती.
चोरही बसमध्ये चढल्या बरेच प्रवाशी सकाळी गारगोठी बसमध्ये बसल्यानंतर अनेक प्रवाशी झोपेत असताना या दोन चोर माहिलांनी झोपेत असलेल्या प्रवाशांचा फायदा घेत गाडीतील बॅगा तपासायला सुरवात केल्या त्या वेळी एका जागृत प्रवाशाला या महिलांच्यावर शंका आल्यावर त्याने झोपेचे सोंग करत त्या महिलांवर लक्ष ठेवले असता एका चोर महिलेने एका महिला प्रवाशाच्या बॅगेतील सोन्याचा डबा काढत असताना त्या जागृत प्रवाशाने प्रवाशाने त्या महिला चोराला रंगेहात पकडले.
सकाळी नऊ साडेनऊ वाजले होते. अचानक एसटी बसमध्ये चोर चोर असा आवाज येत एकच गोंधळ उडाला त्यावेळी त्या चोर महिलेने त्या प्रवाशास ढकलून देत बसमधून पळून प्रयत्न करत असताना प्रवाशांनी पकडून चांगलाच चोप देत गाडी बाहेर आणल्यावर त्या महिला चोराने रस्त्यावर डोके आपटून घेत डोक्याची केस उपटून घेतली व जमिनीवर लोळू लागली दुसर्या चोर माहिलेने आपण चोर असल्याचे कबूल केले. हा गोंधळ अर्धापावून तास हायवेवर सुरु होता. बघ्यांचीही गर्दी वाढली होती. त्यानंतर प्रवाशांनी कासेगाव पोलिस स्टेशनला फोन केला पोलिसांनी त्या चोर महिलांना ताब्यात घेतले व पोलिस स्टेशनला घेवून गेले त्यानंतर सर्व प्रवाशांचा जीव भांड्यात पडल्यानंतर बस सातार्याकडे रवाना झाली.