महाबळेश्वर ः मुंबई येथील वरळी सीलिंक प्रमाणे शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहीर असा 480 मीटर लांब व 15 मी रूंद असा केबलने जोडलेला पुल बांधण्यात येणार आहे या पुलावर 45 मीटर उंचीवर भव्य प्रेक्षा गॅलरी तयार करण्यात येणार आहे गॅलरीत पारदर्शक काचेवर उभे राहुन पर्यटकांना या भागातील निसर्गाचा आनंद लुटण्याची संधी मिळणार असल्याने हा पुल व त्यावरील प्रेक्षा गॅलरी पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे
या पुर्वी राज्यात आघाडीचे सरकार होते या काळात या भागातील विकास कामांकडे कायम दुर्लक्ष केले जात होते या भागातील कामांचे केवळ प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले जात होते परंतु या कामासाठी आर्थिक तरतुद करण्यात येत नसे मात्र युती शासना मध्ये बांधकाम मंत्री असलेले ना एकनाथ शिंदे यांनी या भागाच्या विकासाकडे जातीने लक्ष देण्यास सुरूवात केली त्यांनी आपले वजन वापरून या भागातील विकास कामे मंजुर करून या कामांसाठी करोडो रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली तापोळा अहीर या पुलाला त्यांनी तातडीने 75 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला तसेच या पुलाला जोडणारे रस्त्यांसाठीही मोठा निधी मंजुर केला आता लवकरच या महत्वकांक्षी पुलाचे भुमिपूजन करून पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार आहे वरलीचा सिलिंक पुल हा चायनीज तंत्रज्ञानावर आधारीत आहे मात्र शिवसागर जलाशयावरील पुल हा जर्मन तंत्रज्ञानावर आधारीत आहे हा पुल 2 लेनचा आहे पुलावर दोन्ही बाजुला 2 मीटर रूंद फुटपाथ बांधण्यात येणार आहे पुल पाण्यातील तीन पिलरवर असलेल्या तीन पायलॉनवर केबलस्टे करणार आहे मधील पायलॉनवर 45 मीटर उंचीवर प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधण्यात येणार आहे ही गॅलरी 30 मीटर बाय 18 मीटर एव्हढी मोठी असुन या मध्ये सुमारे 200 पर्यटकांना एकाच वेळी काचेवर उभे राहुन निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे या गॅलरीकडे जाण्यासाठी दोन्ही बाजुला कॅप्सुल लिफट तसेच दोन्ही बाजुने वर जाण्यासाठी पायरयांची तरतुद करण्यात आली आहे पुलाचे बांधकाम व रोपचे काम संपुर्ण जर्मण तंत्रज्ञानांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे या पुलाचा आराखडा तयार करण्यात आला असुन या आराखडयावर मुख्य अभियंता प्रविण किडे अधिक्षक अभियंता एस एस माने कार्यकारी अभियंता संजय सोनावणे व उपविभागीय अभियंता एम एस पाटील हे काम करीत आहेत
महाबळेश्वर येथे नियमित येणारे पर्यटकांची संख्या मोठी आहे परंतु तेच तेच पॉइर्ंट आणि तेच तेच शहर पाहुन अनेक पर्यटक कंटाळले आहे नियमित येणारे पर्यटक हे नविन पॉइर्ंट अथवा आकर्षक ठिकाणाची मागणी करीत होते आता अशा पर्यटकांसह देश भरातुन सहलीसाठी येणारे पर्यटकां साठी शिवसागर जलाशयावर तयार होणार हा पुल व त्या परील विविंग गॅलरी हे नविन आकर्षण ठरणार हे निश्चित या पुलामुळे महाबळेश्वर व तापोळा भागाला भेट देणारे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे जर या भाागातील पर्यटकांची संख्या वाढली तर या दुर्गम व मागासलेल्या भागातील रोजगारात वाढ होवुन या भागातील स्थानिक लोकांच राहणीमान नक्कीच सुधारेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे
पारदर्शक प्रेक्षा गॅलरी ठरणार पर्यटकांचे खास आकर्षण
RELATED ARTICLES