पुसेगाव : पुसेगावमध्ये भारत सरकारची महत्वाकांक्षी आसणारी आधार योजनेला लुटीची किड लागली आहे.
अनधिकृत आधार सेवा केंद्रात विविध प्रकारच्या आधार सेवांसाठी अव्वाच्या सव्वा दराने नागरिकांच्या कडून पैसे आकारणी केली जात आहे. शासनाकडून नवीन आधार कार्ड मोफत व विविध आधार सेवांचे दर जास्तीत जास्त ₹25 असताना नागरिकांना कसलीही पोहोच-पावती न देता ₹150 ते ₹300 आकारले जात आहेत. बर्याच काळापासून सुरू असलेल्या या धंद्याचा अनुभव पुसेगाव व परिसरातील नागरिकांना आला आहे. तरी या अनाधिकृती आधार लुटीला आळा कधी बसणार आसा संतापजनक सवाल शेतकरी,पालक,नागरीक विचारत आहेत.
आज आधार नंबर शिवाय कोणत्याही शासकीय,शैक्षणिक कामाचा कागादही हालत नाही. बँकेच्या व्यवहारातही आधार नंबर पर्याय नसल्याने अनेक शेतकरी,विद्यार्थी ,पालक यांचे आधार नंबर शिवाय अनेक कामे अडून राहत आहेत. याचाच फायदा घेऊन शेतकरी,विद्यार्थी पालक यांना अक्षरशः लुटण्याचा धंदा पुसेगावमध्ये तेजीत आहे.अनेकांना या लूटी मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे अनेकजन दबक्या आवाजात बोलत आहे.
आधार सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला असे अवैध स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे.. शासनाने वा आधार संबंधीत अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन जनतेची होणारी लूट थांबवावी व सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शासनाच्या स्कॉलरशिप साठी बँक खात्याला आधार नंबर लिंक करण्यासाठी पालकांची तारांबळ उठत आहे. याचा फायदा या आधार केंद्रात घेतला जात असून पालकांच्या खिशावर अक्षरशः धाड टाकली जात आहे.
याद्वारे नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या आधार कार्ड माहिती मध्ये काही बदल करायचा असल्यास तो बदल अधिकृत सेवा केंद्रात जाऊन करावा.
पिडीत विद्यार्थी
केतन जाधव , पुसेगाव
मी माझा मेल आईडी आधार नंबरला लिंक करण्यासाठी गेलो होतो पण माझ्याकडून २०० रूपये घेतले या संदर्भात मी तक्रार केली आहे. अॉनलाईन तपासनी केल्यानंतर सदर आधार केंद्र अनाधिकृत असल्याची धक्कादायक माहीती समोर आली असून नागरिकांनी २५ रूपया पेक्षा एक रूपायाही जास्त देऊ नये
एक पालक , ललगुण
माझा मुलगा इयत्ता सहावीला आहे. स्कॉलरशिपसाठी आधार नंबर मोबाईल नंबारला लिंक करण्यासाठी माझ्याकडून 250 रूपये घेण्यात आले हे खरच अन्यायकारक आहे.
अॕड. विशाल जाधव,पुसेगाव.
फेक खात्याचा वापर करून असे बेकायदेशीर आधारसेवा केंद्र चालवली जात आहेत.एकाच खात्यावर अनेक ठिकाणी अशी केंद्र कार्यरत आसल्याचे उघड झाले आहे. याची मोठी साखळीच असून त्यासंदर्भात खालून पासून सर्वांवर कार्यवाही झाली पाहीजे