Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीआजी / माजी सैनिकाच्या विधवांच्या अडीअडचणींचा निपटारासाठी बैठकीचे नियोजन

आजी / माजी सैनिकाच्या विधवांच्या अडीअडचणींचा निपटारासाठी बैठकीचे नियोजन

सातारा: तालुका पातळीवर आजी – माजी सैनिक व माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या,महसूल, पोलीस व इतर अडीअडचणींचा निपटारा करण्याकामी बैठकीचे नियोजन करुन त्या तातडीने निवारण करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या बैठकीचे आयोजन करुन त्यांच्या अडीअडचणींचा तातडीने निपटारा करण्यासाठी दि. 1 एप्रिल 2019 पासून सकाळी 11.00 वाजेपासून लाभार्थी असेपर्यंत पुढील प्रमाणे बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकांसाठी कल्याण संघटकाचे नाव , मोबाईल क्रमांक कंसात व ठिकाण पुढीलप्रमाणे. तहसिल कार्यालय फलटण प्रत्येक महिन्याचा दुसरा शुक्रवार(श्री. कोडग-7387251400), तहसिल कार्यालय वाई महिन्याच्या दुसरा सोमवार (श्री. कोडग-7387251400), तहसिल कार्यालय माण (दहीवडी) प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार (श्री. फाटक-7588380961), तहसिल कार्यालय खटाव (वडुज) प्रत्येक महिन्याचा तिसरा शनिवार (श्री. पवार – 8788306515), मुलांचे वसतिगृह कराड प्रत्येक महिन्याचा पहिला गुरुवार (श्री. फाटक-7588380961), मुलांचे वसतीगृह पाटण प्रत्येक महिन्याचा चौथा सोमवार (श्री. फाटक-7588380961), ग्रामपंचायत सभागृह तारळे प्रत्येक महिन्याचा पहिला शनिवार (श्री. पवार – 8788306515),तहसिल कार्यालय खंडाळा त्रैमासिक महिन्याचा चौथा शुक्रवार (श्री. कोडग-7387251400) असे बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा, कोरेगाव व माढा हे तालुके जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया पासून 20 कि.मी. च्या आतील अंतरावर असल्याने या तालुक्यातील माजी सैनिक व माजी सैनिक विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी. तसेच या तालुक्यातील माजी सैनिक व माजी विधवा यांनी आपल्या अडी – अडचणीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक 02162- 239293 – 229294 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन राजेंद्रकुमार जाधव यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular