Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसुळेवाडी येथे दुचाकी-टेम्पोच्या धडकेत एक ठार ; 2 गंभीर

सुळेवाडी येथे दुचाकी-टेम्पोच्या धडकेत एक ठार ; 2 गंभीर

पाटण:- गव्हाणवाडी ते सुळेवाडी मार्गावरील मांजर खडक नावाच्या परिसरात बुधवार दि. २७ रोजी दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात सोनवडे, ता. पाटण येथील वैभव शेजवळ हा युवक जागीच ठार झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुधवार दि. २७ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सुळेवाडीकडून नवारस्त्याकडे निघालेलो टेम्पो (क्र. एम. एच. ११ एफ. ३७६४) व नवारस्त्याहून सोनवडेकडे निघालेली दुचाकी हिरो पॅशन (क्र. एम. एच. ०५. सी. एच. ९९३२) यांच्यात मांजर खडक नावाच्या परिसरात टेम्पोच्या चालकाकडील बाजूस जोराची धडक बसली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेजण जोरात एका बाजूला फेकले गेले. या अपघातात वैभव विठ्ठल शेजवळ (वय १८ रा. सोनवडे) याचे डोके टेम्पोला धडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश जयवंत भोसले (वय २१) व प्रविण विलास महाडीक (वय २४ दोघे रा. सोनवडे, ता. पाटण) हे गंभीर जखमी झाले आहेत.

दोन वाहनांची धडक एवढी मोठी होती की दुचाकीचा पुढील भाग वाकला असून टेम्पोचा सायलेंसर व लोखंडी अँगल तुटून पडला आहे. अपघात होताच टेम्पोतील चालकाने पळ काढला. दरम्यान, टेम्पोमधून भाकड जनावरांची वाहतूक केली जात होती. अपघात ठार झालेला वैभव शेजवळ हा घरातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या त्याच्या लहानपणीच वडीलांचे अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे त्याच्या आईला तो एकमेव आधार होता. त्याच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान अपघात झालेली जागा धोकादायक असून याठिकाणी असणारा खोल भाग व धोकादायक वळण काढण्याची मागणी होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular