Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीअवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी 9 जणांवर कारवाई

अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी 9 जणांवर कारवाई

सातारा ः सातारा शहरात ठीकठीकाणी अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी 9 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोवई नाका परिसरात रजताद्री हॉटेलच्या भिंतीला विना परवाना फ्लेक्स लावल्या प्रकरणी स्वप्निल राऊत, रा. अयोध्या अर्पाटमेंट अजिंक्य कॉलनी सदरबझार सातारा, स्व.यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाजवळ अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी स्वप्निल दिलीप साळुंखे, प्रशांत अनिल शेलार, तोहसीब आयुब शेख, गणेश उत्तम साळुंखे सर्व रा.कामाठीपुरा सातारा, तसेच स्व.यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर अवैध फ्लेक्स लावल्याप्रकरणी आकाश श्रीकांत गिरीगोसावी, रा.गडकरआळी सातारा, अमन चांदणे रा.मल्हार पेठ सातारा, सागर यादव रा.मतकर कॉलनी सातारा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पो.नि.एन.एम.सारंगकर यांच्या मागदर्शनाखाली पो.नाईक राहूल खाडे, दिपक जोपळे, पो.कॉन्स्टेबल सचिन नवघणे यांनी कारवाई केली. 
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular