मेढा प्रतिनिधी – गुणवंत कामगार प्रतिष्ठान साताराचे वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श कामगार पुरस्कार 2023 चे पुरस्कार जाहीर करण्यात आलेआहेत.
गुणवंत कामगार प्रतिष्ठानने गेली 26 वर्ष सातत्यपूर्ण चालवलेल्या या उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळून दाखल झाकेल्या प्रस्तवापैकी मुलाखतीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना मुलाखतीस बोलावले होते त्यानुसार या पुरस्कारांसाठी श्री सुनील बंडू इंगवले कूपर कार्पोरेशन प्रा. लि. सातारा, श्री नंदकुमार बाबुराव बधे गोदरेज अँड बॉईज मेन्यू कंपनी लिमिटेड ( लॉकिंम मोटर्स ग्रुप ) शिंदेवाडी शिरवळ,
श्री संजय शंकरराव पिसाळ गरवारे टेक्निकल फायबर्स ली वाई, विलास सदाशिव भरगुडे गोदरेज अॅण्ड बॉईज म्यॅन्यु कं. लि ( लॉकिंम मोटर्स ग्रुप ) शिंदेवाडी शिरवळ,, श्री अरविंद नामदेव चौधरी गरवारे टेक्नीकल फायबर्स लि. वाई, श्री किशोर काशिनाथ जाधव वालचंद नगर इंडस्ट्रीज लि सातारा रोड , श्री विकास चंद्रकांत धुमाळ महाराष्ट्र स्कूटर्स ली. सातारा यांची निवड करण्यात आली आहे
सदरचा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दिनांक 2/5/2023 रोजी सायंकाळी सहा तीस वाजता समर्थ सदन पंचपाळी हौदा जवळ राजवाडा सातारा येथे माननीय श्री नितीन देशपांडे मुख्य मानव संसाधन अधिकारी कुकर कार्पोरेशन प्राथमिक लिमिटेड सातारा यांचे शुभ असते तसेच गुणवंत कामगारप्रतिष्ठानचे अध्यक्ष इकबाल काझी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे
तरी या पुरस्कार वितरण समारंभास सातारा येथील बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने सरचिटणीस श्री महेंद्र पवार कार्याध्यक्ष श्री जयंत देशपांडे उपाध्यक्ष सौ श्रद्धा करंदीकर खजिनदार श्री अमृत साळुंखे ज्येष्ठ सल्लागार श्री रघुवीर आपटे श्री दिलीप चरेगावकर श्री गोपाळ खजुरे श्री सुरेश साधले. श्री अशोकराव जाधव श्री गजानन घाडगे जिल्हा संघटक महेंद्र धनवे जिल्हा समन्वयक संजय पवार प्रसिद्धीप्रमुख श्री राजकुमार पवार यांनी केले आहे
गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे “आदर्श कामगार पुरस्कार २०२३” जाहीर
RELATED ARTICLES