केळघरः मोकाशी बंधूंनी गेल्या वर्षापासून सुरु केलेला आदर्श माता पुरस्कार हि संकल्पना जावली तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याला आदर्शवत असून विजयराव मोकाशी व राजेंद्र मोकाशी या बंधुंना मातृऋणानुन उतराई होण्याबरोबरच जन्मभुमी असलेल्या वरोशी या छोट्याश्या गावात सुरु केलेला आदर्श माता पुरस्कार भावी पिढीसाठी प्रेरणादाई असल्याचे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
वरोशी ता. जावली येथे श्रीमती इंदुमती केशवराव मोकाशी यांचे स्मरणार्थ आयोजित आदर्शमाता पुरस्कार वितरण सोहळ्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते यावेळी बीजमाता पुरस्कार वितेत्या राहीबाई सोमा पोपेरे ,मा.आ. सदाभाऊ सपकाळ,जि. प.उपाध्यक्ष वसंतराव मानकुबेर, जि. प. सदस्या अर्चनाताई रांजणे, एकनाथ ओंबळे, विजयराव शेलार,मच्छिंद्र क्षीरसागर, मोहनराव कासुर्डे, राजुशेठ ओंबळे, यावर्षीच्या आदर्श माता पुरस्कार प्राप्त पार्वती कासुर्डे त्यांचे कुटुंबिय, विजयराव मोकाशी , राजेंद्र मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ. भोसले म्हणाले मोकाशी बंधूंनी आपल्या मातृऋणातून उतराई होण्यासाठी गेल्या वर्षी आदर्शमाता पुरस्कार देण्याची आदर्शवत प्रथा सुरु केली आहे यावर्षी भारत सरकारचा बीजमाता पुरस्कार विजेत्या सौ .राहीबाई सोमा पोपरे यांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत या वर्षीचा आदर्शमाता पुरस्कार पार्वती कासुर्डे यांना देवुन मोकाशी कुटुंबियांनी एक आदर्शवत पावुल उचलले असून विजयराव मोकाशी यांनी या विभागाला वरदान ठरणार्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न जवळजवळ मार्गी लावला असून मी स्वतः व आपण सर्वजन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे आ. भोसले यांनी नमुद केले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. राहिबाई पोपेरे म्हणाल्या मी स्वतः अशिक्षित असूनही माझ्या पारंपारिक बि बियाणे जतन करण्याच्या छंदाला ऐवढे पुरस्कार मिळतील असे वाटले नव्हते माझ्याकडे वैज्ञानिक, डॉक्टर, सुशिक्षित तरुण मार्गदर्शण घेण्यासाठी येतात याचे नवल वाटते असे सांगून पारंपारिक बी बियाण्याचे जतन करून दर्जेदार व सकस अन्न उत्पादन कसे घ्यावे याची माहिती देवुन मोकाशी कुटुंबिय करत असलेल्या समाज उपयोगी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयराव मोकाशी , सदाभाऊ सपकाळ, वसंतराव मानकुमरे, एकनाथ ओंबळे, आदिनाथ ओबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी रेंगडी ता. जावली येथील सौ. पार्वती सपकाळ यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्शमाता पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
वरोशी ता. जावली येथील श्री बाजीराव गंगाराम कासुर्डे यांनी स्वत : च्या मुलाच्या लग्नातील अनाठाई खर्च टाळून 11, 000 रु. बोंडारवाडी धरण कृती समितीला सपुर्त केले .
वरोशी या छोट्याश्या गावात सुरु केलेला आदर्श माता पुरस्कार भावी पिढीसाठी प्रेरणादायीः आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
RELATED ARTICLES