Tuesday, November 4, 2025
Homeताज्या घडामोडीअहिल्यादेवी यांचा राज्यकारभार देशापुरता मर्यादित नव्हता ः गोपीचंद पडळकर

अहिल्यादेवी यांचा राज्यकारभार देशापुरता मर्यादित नव्हता ः गोपीचंद पडळकर

फलटण ः अहिल्यादेवी यांनी राज्य कारभार करीत असताना कोणती ही जात धर्म असा भेदभाव केला नाही.मुस्लिमांना तर नमाज पठन करण्यासाठी त्यांनी मज्जिद ची उभारणी आपल्या राज्यात केली होती.अहिल्यादेवी यांचा राज्यकारभार हा केवळ देशापुरता मर्यादित नव्हता तर अहिल्यादेवीने जागतिक नावलौकीक ही मिळविला आहे.असे प्रतिपादन बहुजन नेते गोपीचंद पडळकर यांनी केले.
ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठाण खंडाळा तालुका तसेच समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंती निमित्त लोणंद येथे आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.यावेळी मेळाव्यास हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.मेळाव्याच्या सुरुवातीला दुपारी वाजत गाजत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की,अहिल्यादेवी होळकर यांनी पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणला.सतीची चाल बंद करणारे मल्हारराव होळकर होते.खंडेरावांचे निधन झाल्यानंतर मल्हारराव यांनी अहिल्यादेवी यांना सती जाऊ दिले नाही.सती ची चाल ही प्रथा बंद करण्याचे काम राजाराम मोहन रॉय यांनी केले असे सांगितले जात असते.परंतु होळकर हे सती प्रथेच्या विरोधात होते.यावेळी इतिहासकार झोपले होते काय? असा सवाल उपस्थित करताना आपल्याला यासाठी उठावही केला पाहिजे.असे गोपीचंद पडळकर बोलले.
धनगर समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की वंचित समाजाची तुम्ही मोट बांधा.वंचित घटकाचे संघटन केल्याशिवाय इथल्या प्रस्थापित व्यवस्थेविरोधात आपल्याला लढता येणार नाही.तुम्ही बहुजन वर्गाला बरोबर घेऊन जावा.नुसता धनगर समाज म्हणजे बहुजन समाज नव्हे.बहुजन समाजामध्ये असे अनेक समाज आहेत की त्या समाजाला न्याय मिळाला नाही.सत्ताधार्‍यानी त्याच्यावर कधी ही लक्ष दिले नाही.बहुजनांमध्ये तुम्ही एकोपा जपत तुमच्या हातांमध्ये बहुजनांचे नेतृत्व घ्या.
यशवंतराव होळकर यांचा इतिहास सांगताना ते म्हणाले की यशवंतराव होळकर हे पंचवीस वेळा इंग्रजांशी लढले.देशातील अनेक राजांनी इंग्रजांशी तह करुण आप आपली राज्य काबिज करुण घेतली.पण यशवंतराव हे इंग्रजांशी लढले. त्यांना इंग्रजांची राजवट मान्य नव्हती म्हणुन तर ते इंग्रजांविरोधात पंचवीस वेळा जिंकले.तुम्ही मनापासून ठरवले तर काही ही घडू शकते.राज्यकारभार करणे हे रक्तात असले पाहिजे.आपण होळकरांचे खरे वारसदार आहोत तर आपण का सत्तेचा राज्यकारभार करू शकत नाही.
यावेळी मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले बहुजनांचे नेते गोपीचंद पडळकर यांनी उपस्थितांची मने जिंकली तत्पूर्वी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.सभापती समाजकल्याण जि.प. सातारा आनंदराव शेळके पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.तर यशवंत प्रहार संघटना महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितिन भरगुडे पाटील,रमेश धायगुडे पाटील, आदि सन्मानीय प्रमुख यांनी मनोगत व्यक्त केली.विशेष सत्कारमूर्ती म्हणुन विश्वासराव देवकाते अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, स्नेहल नानासो धायगुडे पाटील जिल्हाधिकारी,पुष्पशील धैर्यशील शेळके पाटील क्रीडा अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे आदिना सन्मानित करण्यात करण्यात आले.यावेळी उत्तमराव जानकर यांनी धावती भेट दिली.नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील,हणमंतराव चवरे,बजरंग खटके, बजरंग गावडे,राजाभाऊ खरात आदिसह इतरही मान्यवर मेळाव्यास हजर होते.मेळाव्याचे सूत्रसंचालन बुरुंगले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक धायगुडे यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular