सातारा : केजी ते पीजी पोस्ट ग्रॅज्युएट अशी संकल्पना शिक्षणासाठी राबवत राज्यातील सुप्रसिध्द अशा अजिंक्य डी वाय पाटील शिक्षण संस्थेची नवीन सीबीएसई शिक्षण पध्दतीवर आधारित शाळा येत्या 14 जून पासून सातारा येथे सुरू होत आहे. प्रारंभिक तत्वावर पुर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यत ही शाळा सातारा येथील आयटीआय समोरील एक एकर परिसरात सुरू होत असल्याची माहिती सातारचे तरूण उद्योजक व शिक्षण संस्थेचे प्रमुख संचालक शोएब कच्छी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शाळेमार्फत संकल्पित उपक्रमात इंजिनिअरींग स्कूल, वैदयकीय महाविदयालय सुरू करण्याचा मानस आहे. या शिक्षण संस्थेच्या मार्फत समाजातील सामान्यातील सामान्य नागरिकालाही गुणवत्तापूर्ण शिक्षण अगदी कमी किमतीत मिळावे हेच ध्येंय असून सातारा हे अल्पावधीत शैक्षणिक प्रगतीसाठी एक चांगले केंद्र निर्माण होईल अशी आशाही कच्छी यांनी व्यक्त केली. सातारा ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली नगरी असून लवकरच सातारचे नाव मुंबईपाठोपाठ घेतले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सातारा बिझनेस सेंटर येथे आयेजित पत्रकार परिषदेत याप्रसंगी डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या नेरूळ मुंबई येथील शाळेच्या प्रिसींपल निवेदिता सिन्हा, इंडस कम्युनिकेशनचे अध्यक्ष विवेक शेट्ठी, अजिंक्य डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे शाखा व्यवस्थापन प्रमुख मंदार कुलकर्णी, श्रीमती पुजा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना निवेदिता सिन्हा म्हणाल्या की, आमच्या शिक्षण संस्थेतर्फें सुरू असलेल्या शाळांची गुणवत्ता उच्च दर्जाची असून मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर यासह परदेशात बेल्जियम येथेही शाळा सुरू आहेत. आमच्या संस्थेचे संस्थापक अनेक वर्षे शिक्षण क्षेत्राशी निगडीत असून गुणवत्ता शिक्षण सातार्यात उपलब्ध करून देणे हाच प्रमुख मानस आहे.
मंदार कुलकर्णी यांनी यावेळी संस्थेच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना सांगितले की केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे हे आमचे शिक्षण पध्दतीत बसत नाही तर विद्यार्थ्याना संपूर्ण जीवनभर शिक्षण घेण्याची आवड निर्माण करणे, त्यांच्यात जिज्ञासा व शोध प्रवृत्तीला वाव देणे यासाठी मोठया प्रमाणात आम्ही झटत आहोत. राज्यासह बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेशातही संस्थेच्या शाळा अतिशय चांगल्या दर्जाचे शिक्षण देत आहेत. पुढील पाच वर्षात 50 ठिकाणी शाळा सुरू करण्याचा संकल्प आहे.
विवेक शेट्टी यांनी समाज निर्मीतीचे ध्येय संकल्प ठेवून ही संस्था कार्य करत आहे. सातार्यातील या शाळेत स्मार्ट बोर्ड, संपूर्ण शाळा एअरकंडीशनर, निसर्गरम्य वातावरण, मुलांना खेळण्यासाठी मैदान व मोकळी जागा तसेच मोबाईल अॅप असणारी सातार्यातील ही सर्वात प्रथम शाळा असणार आहे असे संागितले. दि. 14 जून पासून शाळेचे नुतन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून इच्छुकांनी तातडीने आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी शोएब कच्छी द्वारा अजिंक्य डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, गेंडामाळ, आयटीआय समोर सातारा येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
अजिंक्य डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल सातार्यात सुरू
RELATED ARTICLES