साताराः महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्यावतीने देण्यात येणारा पत्रकार भुषणपुरस्कार सातार्यातील निर्भिड पत्रकार व दै. नवाकाळचे प्रतिनिधी अजित जगताप यांना जाहिर झाला आहे. या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
पत्रकार भुषण पुरस्काराचे वितरण शनिवार दि. 5 जानेवारी रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय डॉ. सुरेंद्र गावकसकर सभागृह, दादर याठिकाणी मान्यवरांच्या देवून अजित जगताप यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार अजित जगताप यांनी गेले 25 वर्षात विविध वृत्तपत्रात तसेच मासिक आणि साप्ताहिकांमध्ये ज्वलंत प्रश्नांवर निर्भिडपणे आवाज उठवून दिनदुबळ्यांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच दै. ऐक्य, नवाकाळ, पुढारी, महासत्ता, नवशक्ती, सांजवात, सातारा टुडे, तरूण भारत अशा दैनिकांमध्ये सातारा व जावली प्रतिनिधी म्हणून सडेतोड लिखाण केले आहे. सध्या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्येही ते कार्यरत आहेत.
त्याचबरोबर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-सुकृत खांडेकर, यशवंत पाध्ये पुरस्कार- सौ. अनुराधा विष्णुपूरीकर, जीवन गौरव पुरस्कार-फादर फ्रान्सीस दिब्रीटो व बाळकृष्ण तेंडुलकर आणि पत्रकार भुषण म्हणून राजेश राजोरे, गणेश पारकर, सौ. अनघा निकम मगदूम तसेच इतर मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यातून शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रा. निळकंठ शिंदे व प्रा. दशरथ साळुंखे यांचीही निवड झाली आहे.
संस्थेचे संस्थापक एकनाथ बिलवटकर प्रमुख कार्यवाहक संतोष धोत्रे, उपाध्यक्ष शंकराव रहाणे, खजीनदार विजय सावंत यांच्यासह समितीने हे पुरस्कार जाहिर केले आहेत.
पत्रकार अजित जगताप यांना पत्रकार भुषण पुरस्कार जाहिर
RELATED ARTICLES