पाटण:- नवी मुंबई येथील २२ वर्षाचा तरुण अक्षय पाटील याने सायकलवरून राज्यभर ८ हजार किलोमीटर ची सफर करून निरोगी शरीरासाठी सायकल चालवा आणि महागड्या इंधनाचे प्रदुषण टाळा असा संदेश देत राज्यातील गडकिल्ले प्रमुख शहरांना भेटी दिल्या. या सफरीत अक्षय पाटील पाटण येथील सुंदरगडावर पोहचला असता तो म्हणाला छत्रपती च्यां स्वराजातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण होणे हे आजच्या काळाची गरज आहे. हे गडकिल्ले सुरक्षित राहिले तरच भविष्यातील महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज समजणार आहेत.
अक्षय पाटील पाटण येथे आला असता त्याचे पाटण चे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आणि सुंदरगड संवर्धन समितीचे सदस्य शंकरराव कुंभार, महादेव खैरमोडे, काशिनाथ विभुते, बाळासाहेब पवार, शंकर मोहिते, बकाजीराव निकम, सुरेश पाटील, लक्ष्मण चव्हाण, अनिल बोधे, अंनिस चाऊस, निलेश फुटाणे, नितीन पवार यांनी स्वागत केले.
अक्षय पाटीलने आजपर्यंत च्या प्रवासात रायगड, प्रबळगड, कर्णाळा किल्ला, शिवणेरी किल्ला, जंजिरा किल्ला, शनिवार वाडा, रत्नदुर्ग- रत्नागिरी, या किल्ल्यासंह नाशिक, शिर्डी, शनिशिंगणापूर, अक्कलकोट, पंढरपूर, कासपठार आदी राज्यभरातील गडकिल्ले, तिर्थक्षेत्र, पर्यटण ठिकाणी भेटी दिल्या. ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथे शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रत्येकाने सायकल चालवणे गरजेचे आहे. सायकल चालवल्याने शरीर तंदुरुस्त होतेच त्याचबरोबर इंधन बचत होत असुन महागड्या इंधनापासुन होणारे प्रदुषण टळेल. सायकल हि आजच्या काळाची गरज असून केवळ गरजेपुरतेच वाहनांचा उपयोग करावा. असे अक्षयने सांगितले. यावेळी अक्षयला पुढील प्रवासासाठी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आणि सुंदरगड संवर्धन समितीच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
निरोगी शरीरासाठी सायकल चालवा आणि महागड्या इंधनाचे प्रदुषण टाळा ,असा संदेश देत जिद्द वेड्या अक्षय पाटीलची सायकलवरून ८ हजार किलोमीटर सफर करून सुंदरगडाला भेट
RELATED ARTICLES