सातारा ः सातारा जावलीचे लोकप्रिय आमदार हे विकास कमामध्ये जागृत असतात त्यामुळे त्यांचे मताधिक्य टिकून आहे. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे सातारा व जावलीतील जनता पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ झालेली आहे. पारंपारिक झरे आटू लागल्यामुळे सातारा तालुक्यात पाणी टँकर पाठविण्याची मागणी वाढ लागली आहे. अशा स्थितीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे परदेशात पॅराग्लॅडिंग मध्ये तर सातारचे सभापती व गटविकास अधिकारी,पाणी पुरवठा अधिकारी पाणी टंचाईच्या दौर्यात व्यस्त झाले आहेत. शनिवार दिनांक 1 जून रोजी सातारा तालुक्यातील परळी व कास भागात पाणी टंचाई बाबत पाहणी करून टँकर मजूरीचा प्रस्ताव सादर होणार आहे.
सातारा तालुक्यातील शिंदेवाडी, भरतगाव वाडी,मत्यापूर, खोडद, कुशी, धनगर वाडी, जावळ वाडी, चोरगेवाडी-पिसाणी, आसगांव, आवाड वाडी, बेंड वाडी, आगुंडे वाडी, लांडे वाडी-वारणा नगर, कामठी तर्फ सातारा, रामकृष्ण नगर, दरे बुद्रुक कुमठे, खेड, करंजे तर्फ परळी अशा 18 गावात पाणी टंचाई बाबत टंचाई घोषीत केली आहे. सध्या आवडवाडी, मानेवाडी, दरेबुद्रुक या 3 ठिकाणी शासनातर्फे व दरेबुद्रुक, मानेवाडी, या दोन ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने पाणी पूरवठा करण्यात येत आहे. पारंपारिक झरे आटल्यामुळे प्रत्यक्षात गावांत जावून परळी, व कास परिसरात पिण्याच्या पाण्याबाबत वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी सभापती मिलिंद कदम, गटविकास आधिकारी शुभांगी गावडे, पंचायत समिती सदस्य हणमंत गुरव, विद्या देवरे, अरविंद जाधव, व पाणी पूरवठा विभागाचे अधिकारी, पेठकरी, ग्रामसेवक, यांचा पाहणी दौरा आयोजित केला आहे.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकित ज्या गावांची पिण्याच्या पाण्याची मागणी आहे. त्या गावात टँकर द्बारे पाणी पूरवठा करण्यासाठी दिवसांत प्रस्ताव मंजूर करावा अशी सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केलेली आहे. त्यामुळे सध्या सातारा तालुक्यात किमान पाणी टंचाईची अर्धा शतक गावे मंजूरीच्या प्रतिक्षेत राहू शकतात कारण सातारा तालुक्यातील काही गावात वळवाचा पाउस झाला नाही.
पाण्याची पातळी खालवत असल्याने पारंपारिक झरे अटू लागले आहेत. याची जाणीव जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना झाली आहे. त्यामुळे तातडीने उपाययोना करण्यासाठी सातारा तालुक्यात हलचाली सुरू झालेल्या आहेत. सध्या कण्हेर धरणात 2.29 टि.एम.सी व उरमोडी धरणात 1.31 टि.एम.सी पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे. कास तलावातील पाण्याची पातळी खालावत असल्याने सातारा शहराभोवती ही पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे.
सातारच्या आमदाराचे पॅराग्लॅडिंग तर पंचायतचे सभापती व वरिष्ठ अधिकारी पाणी टंचाईच्या पाहणी दौर्यात
RELATED ARTICLES

                                    