सातारा ः रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्ट तर्फे नवीन एआयडीसी मध्ये सन 1990 पासून आनंदबन मतिमंद मुलांची शाळा चालविली जाते. ही शाळा अनिवासी असल्याने मुलांची ने-आण करणेसाठी सुरुवातीपासूनच स्कूल बसची व्यवस्था केली आहे. परंतु या बस ची मुदत संपल्याने नवीन बस घेणेचा मोठा प्रश्न संस्थेपुढे होता, पुरेसा निधी नाही,देणगीदारांशिवाय हे शक्यच नाही .हे आवाहन संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ सुधाकर वाघोलीकर यांनी स्वीकारले व कार्य चालू केले. अनेक अडचणी होत्या,परंतु त्यांना रो. राजन मामणिया व रो. दिलीप प्रभुणे यांनी प्रेरणा दिली व सर्व ट्रस्टीनी पूर्ण पाठिंबा दिल्याने डॉ वाघोलीकर यांनी देणगी उभारण्याचे कार्य हाती घेतले. आवाहन करताच रोटेरिअन मित्रांनी, नातेवाईक, व्यावसायिक मित्रांनी अल्पावधीतच देणग्यांचा ढीग लावला. यांमध्ये रो. श्रीराज दीक्षित, रो . संदीप बेताडे,रो. संदीप कणसे यांनी मोलाचा वाटा दिला. शाळेचे कर्मचारी व विद्यार्थी पालक यांचाही मोठा वाटा लाभला. बस डीलर रो. अभिजित पिसाळ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, आणि पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन बस आली. संदीप बेताडे यांनी तिचे सुशोभीकरण केले. इतर सोपस्कार पार पाडून सोमवार दि 29 एप्रिल रोजी आनंदाचा कार्यक्रम वाहन पूजन भव्य कार्यक्रम रोटेरिअन, विदयार्थी, पालक, शिक्षक,व हितचिंतक यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी सर्वच थरातून डॉ वाघोलीकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव पडला.या पूजन प्रसंगी सह प्रांतपाल रो जयवंत भिलारे,रो संदीप कणसे,रो राजेंद्र पवार,रो दीपक तोडकर,रो नरेंद्र शेलार, रो श्रीराज दीक्षित, रो संदीप कोठावळे, रो अमित कदम, रो दिलीप प्रभुणे, रो सुप्रिया प्रभुणे, रो डॉ शंकर गोसावी, रो संदीप बेताडे, रो राजन मामनिया,रो मुकेश पटेल, रो प्रकाश पाटील, रो विजय बाचुलकर, रो ठक्कर शेठ, रो विनोद दोशी, रो अमृता दोशी, रो गीता पाटील,शिक्षक, विद्यार्थी पालक व अनेक हितचिंतक उपस्थित होते.
रोटरीच्या आनंदबन शाळेमध्ये नवीन स्कूल बस दाखल
RELATED ARTICLES