फलटण – फलटण तालुक्यातील राजाळे गावातील पहिली मुलगी कु. अंकिता भरत माने हीने महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या २०१७ च्या पोलिस उपनिरीक्षक ( PSI ) परीक्षेत महिला खुल्या गटातुन राज्यात ३७ वा क्रमांक पटकावून राजाळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तिने अतिशय प्रतिकुल परिस्थीतीवर मात करून गरीब कुंटुबातून जिद्दीने आणि कष्टाने परीक्षेत यश संपादन केले आहे. तिचे आई वडिल शेतात मोल मजुरी करतात ग्रामीण भागातून राजाळे गावाला असलेल्या परंपरेत पहिली मुलगी पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान अंकिता ने मिळवला आहे. फलटण तालुक्यातुन सर्व क्षेत्रातील मान्यवर तिला शुभेच्छा देत आहेत. राजाळे गावातील सर्वांसाठी ही अभिमानाची आणि उत्साहाची गोष्ट आहे सर्वच स्तरातून तिच्यावर व कुटुंबावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.