सातारा ः हाडाचे शिक्षक व कुशल प्रशासक तसेच सामाजिक व राष्ट्रीय हिताचे भान ठेवून विद्यार्थी घडवणारे आ.ब. तथा अण्णा कंग्राळकर सर हे आदर्श मानव मूर्तीकार असून आज वयाच्या 87 व्या वर्षीसुध्दा अण्णांचे अविरतपणे सुरू असलेले कार्य हे नव्या पिढीसाठी दिपस्तंभासारखे असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी काढले.
गुरूवर्य आ.ब. तथा अण्णा कंग्राळकर गौरव समिती व साातरकर नागरिक यांच्या तर्फे आयोजीत नागरी सत्कार समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन व भुजल मंत्री ना. नितीन गडकरी, ना. गिरीष बापट, ना. शेखर चरेगांवकर, विनीत कुबेर, डॉ. सुभाष दर्भे, अॅड. विलास आंबेकर, गुलाब शेख, श्रीधर कंग्राळकर, नरेंद्र पाटील, अजित कुबेर, डॉ. समीर सोहोनी, अनंतराव हलगेकर, कमलाकर गद्रे, राहुल देशपांडे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सत्कार समारंभ प्रसंगी ना. देवेंद्रजी फडणवीस व ना. नितीन गडकरी यांचे हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, पगडी देऊन अण्णा कंग्राळकर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले की, वयाच्या 87 व्या वर्षीसुध्दा अण्णांचा असलेला कामाचा झपाटा तरूणांना लाजवेल असा आहे. अण्णांनी त्यांच्या संपुर्ण आयुष्यात सेवाभावी व निरपेक्ष पणे केलेल्या कार्याची ही पोहोचपावती आहे. समाज, देश यांची बांधिलकी जपत कार्यकरणारे अण्णा आजच्या एकविसाव्या शतकातील ऋषीच आहेत अशा ऋषितुल्य अण्णांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना मी करतो. यावेळी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. नितीन गडकरी यांचा विशेष सत्कार श्रीधर कंग्राळकर व विनीत कुबेर यांनी केला.
अण्णा कंग्राळकरांचे कार्य नव्या पिढीसाठी दिपस्तंंभासारखे ः मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस
RELATED ARTICLES