पाटण:- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची चांगल्या पद्धतीने अमलबजावणी होण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील, पाटणचे प्रांत श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले यांच्या समवेत पाटण तालुक्यातील सर्व राष्ट्रीयक्रुत व सहकारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची आढावा बैठक पाटण तहसील कार्यालय येथे शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी १० वा. आयोजित केली आहे.
महाराष्ट्र शासन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजासाठी मिळणाऱ्या कर्ज योजनेसाठी राष्ट्रीय व सहकारी बँकाकडून या योजनेच्या कर्जासाठी जाचक अटी लावून कर्ज नाकारली जात आहेत. या संबधी पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने बँकांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला होता. तसेच आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातुन आलेली कर्ज प्रकरणाची कारवाई आठ दिवसात करावी अशी मागणी करण्यात आली होती.
महाराष्ट्र शासनाच्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महा मंडळाकडून मराठा समाजातील बेरोजगार युवकांना उध्दोग व्यवसाय निर्मिती साठी विना तारण व्याज परतावा कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेतील कर्जासाठी अर्ज केलेल्या बेरोजगारांना राष्ट्रीय आणि सहकारी बँकाकडून या योजनेतील नियम बाह्य अटी लादून व अडवणुक करुन कर्ज देण्यास नाकारले जात आहे. मराठा बांधवांची अशी शेकडो प्रकरणे बँकेत धुळ खात पडली आहेत. या बँका कडून मराठा समाजाची एकप्रकारे पिळवणुक होत आहे. या पाश्र्वभूमीवर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची चांगल्या पद्धतीने अमलबजावणी होण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील, पाटणचे प्रांत श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले यांच्या समवेत पाटण तालुक्यातील सर्व राष्ट्रीयक्रुत व सहकारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची आढावा बैठक पाटण तहसील कार्यालय येथे शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी १० वा. आयोजित केली आहे. तरी या बैठकीला जास्ती-जास्त मराठा समाज बांधवांनी हजर राहवे असे आहवान पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने केले आहे.