सातारा : सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणार्या गुंफण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये कवी प्रकाश क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, नारायण कापोलकर, अॅड. प्रमोद आडकर, पत्रकार विजय पाटील यांचा समावेश आहे.
सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे अठागण्य व्यासपीठ अशी ओळख असलेल्या गुंफण अकादमीतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येतो. अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी 2018 साठीचे पुरस्कार जाहीर केले. ताळगाव (गोवा) येथील प्रसिध्द कवी, गझलकार, पत्रकार प्रकाश क्षीरसागर यांची साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गुंफण साहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पत्रकारितेबरोबरच त्यांनी बालसाहित्य, कविता, गझल, शायरी, अध्यात्मिक लेखन अशा विविध साहित्य प्रकारात विपूल लेखन केले. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना आजवर अनेक नामांकित पुरस्कार लाभले असून त्यांच्या पुस्तकांचा धारवाड विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला आहे.सातार्यातील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांना गुंफण सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे. सातारकरांची आत्यंतिक निकड असलेल्या कैलास स्मशानभूमीचे देखणे शिल्प उभे करून ते सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ बनले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, बांधकाम अशा निरनिराळ्या क्षेत्रात गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन गुणवाण पिढी घडवण्याच्या कामात त्यांनी असाधारण योगदान दिले आहे. सीमाभागात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्थापना करून मराठी शाळांच्या सक्षमीकरणाचा ध्यास कृतीत आणणारे सावरगाळी (ता. खानापूर, जि. बेळगाव) यांना गुंफण सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकशाही मार्गाने पंचायत समितीवर निवडून आल्यानंतरही त्यांना सीमाप्रश्नासाठी पदाचे बलिदान द्यावे लागले. आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर यांनी साहित्य चळवळ, सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजात सद्भावना निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन त्यांची गुंफण सद्भावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुण्यातील रंगतसंगत प्रतिष्ठानचे ते संस्थापक असून साहित्य व संस्कृतीच्या जपणुकीसाठी त्यांनी मोफत सातशेहून अधिक प्रयोग केले आहेत.
प्रकाश क्षीरसागर, राजेंद्र चोरगे, अॅड. प्रमोद आडकर, पत्रकार विजय पाटील ,नारायण कापोलकर यांना गुंफण पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES